'शिक्षणातून वैचारिक आणि बौद्धिक विकास होणे ही आजच्या युगाची गरज'

गोवा (Goa) मराठी अकादमीतर्फे डिचोलीत (Bicholim) आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत बोलत होते.
Education 

Education 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

डिचोली: शिक्षण हे गुण मिळवण्यापुरते मर्यादित असता कामा नये, तर शिक्षणातून (Education) वैचारिक आणि बौद्धिक विकास होणे ही आजच्या स्पर्धात्मक युगाची गरज आहे, असे मत गोवा मराठी अकादमीचे (Goa Marathi Academy) अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.

<div class="paragraphs"><p>Education&nbsp;</p></div>
फातोर्डा-फोंडा रस्ता अडविल्याबद्दल विजय सरदेसाई आणि इतर 100 जणांवर एफआयआर

गोवा (Goa) मराठी अकादमीतर्फे डिचोलीत (Bicholim) आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात बारावीच्या परीक्षेत मराठी विषयात नव्वद आणि त्याहून अधिक टक्के गुण पटकावलेल्या डिचोलीतील १३५ विद्यार्थ्यांचा गोवा मराठी अकादमीच्या डिचोली विभागातर्फे गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनाही यावेळी गौरवण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Education&nbsp;</p></div>
कोरोनाचे निर्बंध कागदावरच; किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

येथील दीनदयाळ सभागृहात आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र सावईकर, तर अध्यक्षस्थानी गोवा प्रा. अनिल सामंत (Anil Samant) उपस्थित होते. अन्य मान्यवरांत निवृत्त अधिकारी सूर्यकांत देसाई, निमंत्रक प्रा. सोमनाथ पिळगावकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी राजेंद्र सावईकर यांनी विद्यार्थ्यांना (Students) मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. सोमनाथ पिळगावकर यांनी केले. प्रा. स्वाती पाठक आणि प्रा. अनघा गावस यांनी सूत्रसंचालन केले. शुभलता कळंगुटकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com