Goa Drone Hub: गोव्याचे ड्रोन हबचे स्वप्न पूर्ण होणार, हवाईपट्टी बांधण्यासाठी सरकार प्रयत्नशील

किटल येथे ‘एअरस्ट्रीप’ची योजना : केपे तालुक्यातील मागास गाव येणार विकासाच्या मुख्य प्रवाहात
Goa Drone Hub
Goa Drone HubDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drone Hub: विकासाच्या दृष्टीने मागास राहिलेल्या केपे मतदारसंघासाठी भविष्यात ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत मिळत आहेत.

या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (ओशियोनेरियम) उभारण्याची घोषणा नुकतीच केलेली असताना राज्य सरकारने केपे तालुक्यातील किटल येथे ड्रोन चाचणीसाठी हवाई पट्टी बांधण्याचे ठरविले आहे.

गोवा ड्रोन धोरण 2022 नुसार राज्याला ड्रोन निर्मितीचे केंद्र बनविण्यासाठी आणि ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची योजना याआधीच अधिसूचित केली गेली आहे.

ही हवाईपट्टी उभारण्यासाठी राज्य सरकारने तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) बोलिदारांकडून मागण्याचे ठरविले आहे, ज्यामध्ये प्रकल्पाची प्राथमिक रचना आणि तपशीलवार अंदाज समाविष्ट करणे आवश्यक आहे.

Goa Drone Hub
Sewage Water Tanker Issue: आमदार आंतोन वाझ यांनी RTOला 'त्या' 2 टँकरचे परवाने निलंबित करण्याचे दिले निर्देश; कारण...

उत्पादक, चाचणी आणि प्रमाणित संस्था, पायलट प्रशिक्षण संस्था, ड्रोन नोंदणी आणि पायलट प्रमाणपत्र जारी करण्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुलभ डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मसाठी नेमलेले राज्य नोडल अधिकारी करणार आहेत.

एक हवाई पट्टी

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एअरस्ट्रीप तयार झाल्यावर ती ड्रोनची चाचणी करू इच्छिणाऱ्या उत्पादकांना राज्य आपल्याकडे आकर्षित करू शकेल.

आम्ही गोव्याला ड्रोन निर्मितीसाठी आघाडीच्या राज्यांपैकी एक बनवण्याचे प्रयत्न करत असून त्यासाठी आम्हाला पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ड्रोन चाचणीसाठी एक हवाई पट्टी, हे पहिले पाऊल आहे.

Goa Drone Hub
Goa Mine: पर्यावरण परवाना बंधनकारकच! गोवा फाउंडेशनचा युक्तिवाद खंडपीठाला मान्य

20 टक्के सवलत

राज्याच्या ड्रोन धोरणानुसार, गोव्यात ऑपरेशन्स सुरू करणाऱ्या ड्रोन कंपन्या आणि ड्रोन संबंधित अन्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या अर्ज करू शकतील. ज्यांना या योजनेअंतर्गत 20 टक्के सवलत प्रोत्साहन स्वरूपात मिळू शकेल.

गोवा स्टार्टअप पॉलिसी 2022 आणि गोवा आयटी पॉलिसी 2018 अंतर्गत लाभ ड्रोन आणि ड्रोन घटक उत्पादक आणि सेवा देणाऱ्यांना प्रदान करेल.

ड्रोन वापरास प्रोत्साहन ः गोव्याला नागरिक सेवा पुरवण्यासाठी तसेच कृषी, वनीकरण, फलोत्पादन, आरोग्यसेवा, खाणकाम आणि पर्यटनासाठी ड्रोनचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे.

गोव्याला ड्रोन इको सिस्टीममध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि कुशल नोकऱ्या निर्माण करण्यासाठी या धोरणाचा वापर करायचा आहे, हे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com