Goa Horticulture Corporation: ‘फलोत्पादन’ची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Goa Horticulture Corporation: प्रेमेंद्र शेट : पुढील वर्षापासून रानभाजीची विक्री करण्याचा मानस
Goa Horticulture Corporation:
Goa Horticulture Corporation: Dainik Gomantak

Goa Horticulture Corporation: फलोत्पादन महामंडळ हे गोव्यातील जनतेला जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे सेवास्वरूपी कार्य करते. त्यामुळे हे महामंडळ ‘ना नफा ना तोटा’ या स्वरूपात कार्यरत असून आमची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू असल्याचे गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

Goa Horticulture Corporation:
Goa Weather Update: ‘ऑक्टोबर हिट’मुळे नागरिक हैराण

शेट म्हणाले, आम्ही गोव्यातील जनतेला जी सेवा देतो, भाजीविक्री करतो ती बंद केल्यास दलाल हैदोस घालतील. बाजारात आपल्याला हवी आहे त्या दरात भाजीविक्री करतील, त्यामुळे भाजीच्या तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य हे महामंडळ करत असल्याने गोव्याच्या जनतेच्या हिताचे आहे.

आमच्या महामंडळाद्वारे दरदिवशी सुमारे १४० टन भाजीची विक्री केली जाते. त्यातील 2 ते 3 टन भाजी ही गोमंतकीय शेतकऱ्यांची असते. उर्वरित भाजी ही बेळगावहून आयात करावी लागते. महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई म्हणाले, गोव्यात कांदा, बटाटा, टोमॅटो यासारख्या तसेच काही फळभाज्यांचे उत्पादन घेतले जात नाही,

त्यामुळे आम्हाला त्या बेळगावहून आणाव्या लागतात. गोव्यातील शेतकरी प्रामुख्याने भेंडी, चिटकी, वाली, वांगी तसेच काही पालेभाज्यांचे पीक घेत असतात. त्यामुळे उर्वरित भाज्या व इतर जीवनावश्‍यक वस्तू आम्हाला आयात कराव्या लागतात.

जनतेच्या आरोग्याकडे लक्ष

राज्यातील जनतेला आरोग्यवर्धक रानभाजी मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ व्हावी या उद्देशाने पुढील वर्षापासून अळू, टायकाळो, कुड्डू तसेच इतर भाज्या शेतकऱ्यांद्वारे विकत घेतल्या जातील. आणि त्यांची आमच्या गाळ्यांद्वारे विक्री करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com