Goa Weather Update:
Goa Weather Update:Dainik Gomantak

Goa Weather Update: ‘ऑक्टोबर हिट’मुळे नागरिक हैराण

Goa Weather Update: मॉन्सुनोत्तर कालावधीचा परिणाम : आवश्‍यक काळजी घेण्याचे आवाहन
Published on

Goa Weather Update: राज्यात माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात झाली आहे. मॉन्सुनोत्तर कालावधीत हवामानात सातत्याने होणारे बदल, आकस्मिक पाऊस आणि धुके यासहितच ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत.

Goa Weather Update:
World Mental Health Day: मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज

राज्यात सर्वसामान्यपणे १४ ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या पावसाला सुरवात होते; परंतु राज्यात अजून परतीच्या पावसाचे आगमन झालेले नाही. यंदा मॉन्सून गोव्यात दाखल होण्यासाठी देखील १५ दिवस उशीर झाला होता.

त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यंदा १९७२ नंतरचा सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील दोन दिवस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तसेच चक्रीय वारे घोंगावण्याच्या शक्यता असून त्याचा फटका गोव्याच्या हवामानावर होण्याची शक्यता वर्तविली आहे.

ऑक्टोबर हिट’ म्हणजे काय?

ऑक्टोबरमध्ये दक्षिण-पश्चिम मॉन्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळ्याला सुरवात होण्याचा हा काळ असतो. या दिवसांत आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करत असतात. या अतिनील किरणांमुळे मोठ्या प्रमाणात होणारी उष्णता या महिन्यात वाढते. या उष्णतेलाच ‘ऑक्टोबर हिट’ असे म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com