Goa Monsoon Update: येत्या 48 तासांत राज्यात मान्सून 'कमबॅक'

येत्या 48 तासांत पावसाचा (Monsoon) जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: यंदा राज्यात (Goa) आत्तापर्यंतचा पाऊस (Rain) दरवर्षीपेक्षा बराच कमी पडला आहे. त्यामुळे ही कमतरता भरून येण्यासाठी येत्या काळात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची गरज (The monsoon will make a comeback in the state in the next 48 hours)

आहे. आत्तापर्यंत राज्यात 979.9 मी.मी. अर्थात 38.56 इंच पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी 5 जुलैपर्यंत पडलेल्या पावसापेक्षा यंदाचा पाऊस 089.0 मी.मी. अर्थात 3.5 इंच कमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला होता. त्यामुळे पावसाने विक्रमाची नोंद केली होती. यंदा, मात्र अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. 6 जुलै रोजी पाऊस कमी राहणार आहे. मात्र 8, 9 जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

जूनच्या अखेरीस काढता पाय घेतलेल्या मॉन्सूनचा (mansoon) ‘कमबॅक’ येत्या 48 तासांत होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण आणि उत्तर कोकण (konkan) भागात 8 ते 10 जुलैला मुसळधार (heavy rain) पाऊस पडणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर (tauktae cyclone) राज्यात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले होते; मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनने हुलकावणी दिली. रखडलेला मॉन्सूनच्या प्रवासानंतर आता पुन्हा पुणे वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Goa Monsoon Update
Goa Monsoon Update: दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पावासाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील शेती लागवडीत मोठा व्यत्यय आला आहे. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर भातशेतीची लागवड सुरू झाली असली तरी पावसाचे पाणी हे भात शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती केली जाते; मात्र कोकणातील किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (sindhudurg district) भात शेती अजूनही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार मॉन्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण 15 दिवसांत तयार झाले नव्हते. त्यामुळे कोकण प्रदेशात मॉन्सूनचे सक्रिय वारे नसल्याने आणि अरबी समुद्रात तशी परिस्थिती नसल्याने पावसाला पोषक वातावरण मिळाले नव्हते; मात्र येत्या 48 तासांत दक्षिण आणि उत्तर कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर 8 ते 10० जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्याता ही हवामान खात्यानं वर्तविली आहे. त्यानंतर राज्यात पावसाचे सातत्य कायम राहील. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com