Lok Sabha Election: लोकसभेच्‍या मतोत्‍सवाला लाभणार पर्यावरणीय साज

Lok Sabha Election: विधायक संकल्प: आयोग करणार 20 हजार वनौषधी, फळझाडांची लागवड
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Dainik Gomantak

Lok Sabha Election:

नीरज नाईक

होऊ घातलेली लोकसभा निवडणूक पुढील काही पिढ्यांच्‍या लक्षात राहणार आहे. त्‍याला कारणही विधायक असेच आहे. राज्‍य निवडणूक आयोगाने ‘मतोत्‍सव’ यादगार बनवण्‍यासाठी राज्‍यभरात 20 हजार वनौषधी व फळझाडांची लागवड करण्‍याचे निश्चित केले आहे.

परिणामी पुढील पाच वर्षांनी होणारा लोकसभेचा मतसंग्राम ‘हरित निवडणूक’ म्‍हणून ओळखला जाईल. राज्‍यात १,७२५ मतदान केंद्रे आहेत. प्रत्‍येक ठिकाणी निवडणूक आयोगाचे कर्मचारी किमान ५ रोपे लावतील. त्‍यासाठी मोकळ्या जागा निश्‍चित करण्‍यात येतील; तर काही मतदारसंघांत रस्‍त्‍यांच्‍या नजीक वृक्षारोपण करण्‍यात येईल.

Lok Sabha Election 2024
kidnaping Case: न्हावेली-साखळी येथून बालकाचे अपहरण करणारा मुंबईत जेरबंद

केवळ रोपण केले जाणार नाही, तर पाऊस पडेपर्यंत आवश्‍‍यक तितके पाणीही पुरवले जाईल. निवडणूक आयोगाने तशी तजवीज केली आहे. मुख्‍य निवडणूक अधिकारी राजेश वर्मा यांनी सदर मोहिमेसह अन्‍य बारकावेही ‘गोमन्‍तक’शी बोलताना उलगडले. ‘पर्यावरण जपा, पर्यावरण स्‍नेही वागा’, हा संदेश त्‍यामधून देण्‍यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com