न्हावेली-आमोणे (साखळी) येथून 8 वर्षीय बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित आरोपी फेको कुमार (मूळ बिहार) याला कल्याण- मुंबई येथे अटक करण्यात आली. अपहृत बालकाची सुखरूप सुटका करण्यासही पोलिसांना यश आले. दरम्यान, संशयिताला सध्या सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संशयित फेको कुमार हा न्हावेली-आमोणे येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथूनच 13 मार्च रोजी त्याने एका 8 वर्षीय बालकाचे अपहरण केले. याप्रकरणी मूळ बिहार येथील आणि न्हावेली-आमोणे येथेच राहणारे शरीफ शाह (44) यांनी दि. 14 रोजी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या 363 आणि बालहक्क कायदा : 2003 अंतर्गत कलम 8 खाली गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
अन् मोहीम झाली फत्ते
तपासादरम्यान अपहरण झालेल्या बालकाच्या खोलीशेजारीच राहणारा फेको कुमार हासुद्धा गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यानेच बालकाचे अपहरण केल्याचा संशय बळावला. मोबाईल लोकेशनवरून संशयित मुंबईत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांची दोन स्वतंत्र पथके त्याच्या मागावर पाठविण्यात आली. शेवटी मुंबईतील कल्याण येथे संशयिताला जेरबंद करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पोलिसांनी अपहृत बालकाचा शोध लावला व सुखरुप पालकांच्या स्वाधीन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.