Panjim Smart City: मलनिस्सारण काम ‘जी-सुडा’च्या अंगलट

स्मार्ट सिटी : सांतिनेज परिसर बनला दुर्गंधीयुक्त : खणेल, तशी कोसळते माती
Smart City
Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Smart City: पणजी शहरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम नगर नियोजन विकास खाते करत आहे. सांतिनेजमध्ये मुख्य वाहिनी टाकताना या खात्याची आता सत्त्वपरीक्षा सुरू झाली आहे.

ताळगाव आणि मिरामारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या (वाय आकाराच्या) मध्यभागी मलनिस्सारणाचे चेंबर बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खोदकाम करेल तशी माती ढासळत आहे. त्यामुळे हे काम ‘जी-सुडा’च्या अंगलट आले आहे.

Smart City
Goa Accident: कुठ्ठाळीतील अपघातात तिघे गंभीर जखमी

काही दिवसांपूर्वी पायोनिअर औषधालयासमोर अशाचप्रकारे चेंबरसाठी खड्डे खोदल्यानंतर समस्या निर्माण झाली होती.

...तर नाकीनऊ येणार : मॉन्सूनने ओढ दिल्याने किमान काम करताना अडथळा आला नाही. पावसाळा सुरू झालाच तर हे काम करताना ‘जी-सुडा’ला नाकीनऊ येऊ शकते. संबंधित कंत्राटदाराला मुदत दिली होती, परंतु ते न झाल्याने हे कामही ‘जी-सुडा’ला पूर्ण करावे लागणार आहे.

Smart City
Goa Congress: स्मार्ट सिटीच्या कामाबाबत विविध खात्यांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावेत; काँग्रेसची मागणी

अभियंते, कंत्राटदाराची तारेवरची कसरत

मलनिस्सारण विभागाकडे तज्ज्ञ अभियंते आहेत, त्यांची मदत ‘जी-सुडा’ने घ्यावी, असेही सुचविले, पण त्यांची मदत कितपत घेतली, हा प्रश्‍नच आहे.

सांतिनेज भागामध्ये वाहिनी बदलण्याचे काम सुरू झाले आहे, तेव्हापासून दुर्गंधी पसरत आहे. आताही त्याठिकाणी दुर्गंधी पसरली असून, संबंधित खात्याचे अभियंते आणि कंत्राटदाराची सध्या तारेवरची कसरत सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com