Goa Congress: सासष्टी तालुका काँग्रेस पक्षाचा अभेद्य गड ढासळला

Goa Congress: सासष्टी निकाल फिरवेल, अशी भाजपला आता वाटत नाही भीती!
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress

सासष्टी हा एकेकाळी कॉंग्रेस पक्षाचा अभेद्य, दणकट बालेकिल्ला होता. कॉंग्रेस पक्षाने एदुआर्द फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, लुईझिन फालेरो यांच्यासारखे ज्येष्ठ नेते येथून दिले; एकेकाळी तर अनेक सरकारांमध्ये या तालुक्यातून सातजण मंत्री असत.

सध्या मुश्‍किलीने या तालुक्यातून केवळ एकाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळते. भाजपने प्रयत्नपूर्वक २०१२ पासून या तालुक्यावर धडका द्यायला सुरवात केली; आज लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवाराला हा तालुका विजय होण्याइतकी मतांची भरभक्कम आघाडी देऊ शकतो का, हा प्रश्‍नच आहे.

Goa Congress
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

भाजप दोन्ही मतदारसंघांत जिंकू शकतो, याचे गणित मांडणे सोपे झाले; कारण सासष्टीमध्ये फारसे लक्षणीय मतदान झाले नाही; ख्रिस्तीबहुल भागांमध्ये तर खूपच कमी झाले आहे.

भाजपच्या निवडणूक पंडितांच्या मते, यावेळी गोव्यातील मतदान ८० टक्क्यांवर झाले आहे. हा वाढीव टक्का कार्यकर्त्यांच्या एकसंघ चिकाटीच्या कामामुळे साध्य करता आला, असे हे पंडित मानतात. देशात वाढलेल्या तापमानामुळे कमी मतदान नोंदविले गेले. गोव्यात तसे का झाले नाही? कारण राज्य लहान आहे, येथे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कार्यकर्त्यांना सहज शक्य झाले, असे भाजपच्या संघटनात्मक नेत्यांचे म्हणणे आहे.

२०१४ व २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यावेळी भरीव मतदान, ७६.२६ टक्के मतदान झाले व टपाल मतदानाचा विचार करता, ही टक्केवारी ७७ टक्क्यांवर पोहोचणार आहे, जो एक विक्रम मानण्यात येतो. भाजप पंडितांच्या मते, ज्या सासष्टी तालुक्याला कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, तेथे आज कॉंग्रेसचा केवळ एक आमदार आहे.

‘आप’ व गोवा फॉरवर्डने तेथे कॉंग्रेसला शह दिला आहे. हे पंडित मानतात की, पुढच्या निवडणुकीत ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ही आमदार जिंकून आणतील. एकेकाळी सासष्टी तालुक्यात १२ पैकी सातजण मंत्री असत. सध्या मुश्‍किलीने एकालाच मंत्रिपद लाभले. तेसुद्धा बऱ्याच प्रयत्नांनंतर आलेक्स सिक्वेरांना ते देण्यात आले आहे.

सासष्टी मिशन’द्वारे मनोहर पर्रीकर यांनी सासष्टीच्या बालेकिल्ल्यावर धडका द्यायला सुरवात केली आणि २०१२ मध्ये अपक्ष निवडून आणून कॉंग्रेसला शह दिला. नंतर फातोर्डा, कुंकळ्ळी, नावेलीतही भाजप उमेदवार जिंकून आणू शकतो, हे सिद्ध केले.

लोकसभेसाठी मोदी करिष्म्याला परिश्रमाची जोड

या निवडणुकीत कोणतीही लाट नव्हती. मोदींचा करिष्मा होताच. शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे परिश्रम होते. त्या जोडीला भाजप संघटनेने अत्यंत सूत्रबद्धरित्या कार्य केले.

त्यामुळे ही टक्केवारी वाढली, असा निष्कर्ष भाजप संघटनेने आपल्या मतदानपश्‍चात निवडणूक विश्‍लेषणात काढला आहे. ‘भाजप संघटनेने गोव्यातील ५० टक्के मतदान हिस्सा प्राप्त केला आहे’, असा त्यांचा दावा आहे.

भाजपच भक्कम

सासष्टीचे राजकीय वर्चस्व मोडून काढण्यात यश मिळविल्यामुळे भाजपच्या दृष्टीने दक्षिण-उत्तर असा भेदभावच राहिलेला नाही. सासष्टीत आठपैकी चार मतदारसंघांत भाजपचे आधीच वर्चस्व होते. त्यात मडगाव, नुवे, बाणावली, कुडतरी व वेळ्ळी. तेथेही मतदान कमी होते व या मतांच्या आघाडीमुळे कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा दावा करता येणार नाही; कारण दक्षिणेतील इतर मतदारसंघांत भाजपच्या बाजूने मतदान होते.

कॉंग्रेसचा नाकर्तेपणा

भाजपच्या दक्षिणेतील उमेदवाराचाही विजय खात्रीपूर्ण असल्याचा अंदाज भाजप संघटनेने व्यक्त केला आहे. पल्लवी धेंपे या नवख्या व त्यांना भेटणे दुरापास्त ठरेल, हा कॉंग्रेसचा प्रचार सुरवातीला प्रभावी वाटला असला, तरी त्यांचे उमेदवारीच्या स्पर्धेत मागे पडलेले ॲड. नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक यांनीही वाहून घेऊन काम केले, त्या तुलनेत कॉंग्रेसचे स्पर्धक उमेदवार घरी बसून राहिले.

Goa Congress
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

‘आप’मुळे कॉंग्रेसचे मताधिक्य घटले

आज भाजपच्या संघटनेने जोरदार कामाने सांगे, काणकोण, सावर्डे व बऱ्याच प्रमाणात केपे मतदारसंघातही मोठे मताधिक्य प्राप्त करण्यासाठी शिकस्त केली आहे. त्यामुळे केवळ ख्रिस्ती मतदार वश करण्यासाठी गुंतलेल्या कॉंग्रेसला दक्षिणेत हा मोठाच शह आहे. आरजी, ‘आप’मुळे कॉंग्रेसचे मताधिक्यही घटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com