सोनसोडोवर उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांना उंची देणार

सोनसोडोवरील अग्निप्रलयाचे कारण गुलदस्त्यात; सोनसोडोवर उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांना उंची देणार
fire in Sonsodo
fire in SonsodoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गेल्या आठवड्यात लागलेल्‍या सोनसोडोवरील अग्निप्रलयाचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. तरी या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याच्या हेतूने वीज खात्याने तेथील 33 केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहिन्या अधिक उंचीवर नेण्याचे काम हाती घेतले आहे. ही व्यवस्था तात्पुरती असल्याचेही विद्युत विभागाने सांगितले आहे. (The height of high voltage power lines at Sonsodo will be increased)

वीज खात्याचे साहाय्‍यक अभियंता कार्लुस फर्नांडिस यांनी वरील गोष्‍टीला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की, ही तात्पुरती व्यवस्था आहे. सध्या जे खांब आहेत ते पूर्णतः कचऱ्याच्‍या (Garbage) ढिगांमध्‍ये बुडालेले आहेत. म्हणून तेथे अधिक उंचीचे खांब टाकले आहेत. त्यामुळे वीजवाहिन्या अधिक उंचीवरून जातील.

fire in Sonsodo
अज्ञातानं कचऱ्याला लावली लाग, अडीच लाखांचे नुकसान

दरम्‍यान, फर्नांडिस यांनी गत आठवड्यातील आग शॉर्टसर्किटमुळे (Shortcircuit) लागल्याचा इन्कार करताना वस्तुस्थिती स्‍पष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला. ते म्‍हणाले की, आगीची तीव्रता इतकी होती की तेथील वीज कंडक्टरही वितळून गेले आहेत. वीजवाहिन्यांचे स्थलांतर करण्याची खात्याची तयारी आहे, पण त्यासाठी काही अटी पालिकेला (Municipality) पाळाव्या लागतील. तसेच 15 टक्के शुल्कही चुकते करावे लागेल. वीजवाहिन्यांलगत कचरा राशी तयार न करण्याच्या खात्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याकडेही त्‍यांनी लक्ष वेधले.

दुसरीकडे उपजिल्हाधिकाऱ्यांनी (Deputy Collector) सार्वजनिक बांधकाम खात्‍याला सोनसोडोवर जलवाहिनीचा होज बसविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आपत्कालीनप्रसंगी पाणीपुरवठा (Water supply) होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com