Goa Beach : समुद्रकिनाऱ्यांवर स्थानिकांचीच गर्दी

दक्षिणेतील किनारे फुलले : युवकांबरोबरच वयोवृद्धही लुटताहेत समुद्रस्नानाचा आनंद
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

तापमानाचा पारा वाढत असल्याने उकडा असह्य होऊ लागला आहे. अंगाची लाहीलाही होत असल्याने अनेकांनी कालवे, नदी, झरे व समुद्रकिनारे याकडे स्नानासाठी धाव घेतली आहे. मोले, शिरोडा, कुळे, सावईवेरे या ग्रामीण भागातील रहिवासी समुद्रस्नानासाठी सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यांवर दाखल व्हायला लागले आहेत. अशाने कोलवा, माजोर्डा, बाणावली येथील समुद्रकिनारे पर्यटकांऐवजी स्थनिकांनी फुलून निघत आहेत.

रविवारी (ता.१४) अशीच गर्दी ग्रामीण भागातील रहिवाशांनी सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यांवर केली होती. यातील काहीजण आपल्या परिवारासोबत, मित्रमंडळी व गटागटाने दाखल झाले होते. यात युवक-युवतींबरोबर अधिक प्रमाणात वयोवृद्धांचाही समावेश होता. सर्वजण उत्साही दिसत होते.

Goa Beach
Fish Price Hike in Bicholim : दिवस सुक्या मासळीचे, डिचोलीत वाढतेय आवक; पुरूमेंताची तयारी

पारोडा येथील आंतोनेत वाझ या ६५ वर्षीय महिला आपल्या सवंगड्यांसमवेत कोलवा समुद्रकिनाऱ्यावर स्नानासाठी आल्या होत्या. त्या येत्या बुधवारी परत निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दयानंद नार्वेकर हे बाणावली येथील समुद्रकिनाऱ्यावर आले होते. त्यांनीही या ठिकाणी समुद्रस्नानाचा आनंद लुटला होता.

दरवर्षी सुट्टी घेऊन करतात पिकनिक...

  • बोनया-सावईवेरे येथील गौरीश गिरोडकर या युवकाने सांगितले की, दरवर्षी कुटुंबासोबत कोलवा किनाऱ्यावर तो येतो. यावेळी २४ जण आलो आहोत. समुद्रस्नानामुळे अंगाची लाही काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे येथे दरवर्षी कामावरून सुट्टी घेऊन न चुकता येथे येतो. कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटून वेळ घालविण्यात खूप मजा येते.

Goa Beach
Traffic Jam In Porvorim : पर्वरीत वाहतूक कोंडी नित्याची; अपघातांतही वाढ
  • बोरी-फोंडा येथून प्रशांत बोरकर व त्यांचे मित्रमंडळी बाणावली येथील समुद्रकिनाऱ्यावर आपली पिकनिक साजरी करण्यासाठी रविवारी आले होते. यादरम्यान त्यांनी संपूर्ण दिवस समुद्रस्नानासाठी घालविला. दरवर्षी आपण या उकाड्याच्या दिवसांत सुट्टी घेऊन येथे दाखल होतो. येथील समुद्रकिनाऱ्यांवर स्नान करण्याची मजा वेगळीच आहे, असे त्यांनी सांगितले.

Goa Beach
SSC Board Exam Result: या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल; बोर्डाने घेतला एक महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर
  • ग्रामीण भागातील रहिवाशांबरोबरच फातोर्डा, मडगाव येथील शहरी भागातील रहिवाशांचाही कल समुद्रस्नानाकडे वाढला आहे. यावेळी येथे आलेल्या फातोर्डा येथील वयस्क महिला गौरी पेडणेकर यांनी सांगितले की, यावर्षी आम्ही कुटुंबासोबत येथे स्नानासाठी येण्यास पसंती दाखविली. गेल्या वर्षी त्यांचे कुटुंब काब द राम याठिकाणी समुद्रस्नानासाठी गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com