Traffic Jam In Porvorim : पर्वरीत वाहतूक कोंडी नित्याची; अपघातांतही वाढ

बेदरकार ‘ड्रायव्हिंग’ ठरतेय कारण : पंचायतींकडून ठराव, पत्रव्यवहाराचा फार्सच !
Traffic jam In Porvorim
Traffic jam In PorvorimDainik Gomantak

Traffic Jam In Porvorim: पर्वरी संजय स्कूल ते गिरी पर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. संजय स्कूल कडून वडाकडे पर्यंत हा रस्ता एक मार्गी असला तरीही येणारे मोठे ट्रक, टँकर, व वाहन चालक यांचे बेदरकारपणे चालवणे व या भागातील व्यावसायिकांचे बेशिस्त पार्किंग हे या वाहतूक कोंडी तसेच अपघातास मुख्य कारण ठरत आहे.

या महामार्गात लागणाऱ्या पंचायतींच्या ग्रामस्थांनी वारंवार हा विषय ग्रामसभेत उपस्थित केला होता. परंतु फक्त ठराव मंजूर करणे व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रे पाठवणे, यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ठराव आणि पत्रव्यवहार हा फार्सच ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Traffic jam In Porvorim
Fish Price Hike in Bicholim : दिवस सुक्या मासळीचे, डिचोलीत वाढतेय आवक; पुरूमेंताची तयारी

या महामार्गावर उड्डाणपूल करण्याचे फार पूर्वी ठरले आहे,मात्र अजूनही मुहूर्त सापडत नाही. रस्त्यालगतच्या शोरूम व्यावसायिकांमधून या उड्डाणपुलाला अडथळा तर करण्यात येत नाही ना, असा प्रश्न या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.

बस्तोडा, गिरी, सांगोल्डा, सुकूर, साल्वादोर दू मुंद, पेन्ह द फ्रान्स, वेरे रेईस मागूस, पिळर्ण या साळगाव व पर्वरी मतदार संघातील या पंचायतीतून सदर रस्ता जातो. सर्व बाबतीत अग्रेसर असणाऱ्या या दोन्ही मतदारसंघांतून मागील ३-४ वर्षे या उड्डाणपुलाविषयी काहीच हालचाल नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

Traffic jam In Porvorim
ATM Security in BIcholim :डिचोलीत बँकांचे ‘एटीएम’ कक्ष असुरक्षित?

‘ते’ पोलिस पुन्हा दिसलेच नाहीत !

या रस्त्यावर पोलिस यंत्रणा वाढवण्यासाठी, स्थानिक आमदार व पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी विशेष प्रयत्न करून, वाहतूक पोलिस शाखा पर्वरीत सुरू केली होती. ही शाखा सुरुवातीस सर्व ठिकाणी व्यवस्थित पोलिस नेमून वाहतूक सुरळीत करण्यात यशस्वी झाली होती. पण सदरचे वाहतूक पोलिस बंदोबस्तासाठी म्हणून एक-दोन दिवसांसाठी नेले गेले, नंतर पुन्हा त्या जागेवर दिसले नाहीत.

बेशिस्त पार्किंगचे ‘येरे माझ्या मागल्या’ !

रस्त्याच्या दोन्ही बाजूस बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने टो करून पोलिसांनी ताब्यात घेतली होती. कारवाईच्या भीतीने एक दोन दिवस पार्किंग व्यवस्थित झाले परंतु नंतर पोलिसांची कारवाई मात्र बंद झाली. पुन्हा ''ये रे माझ्या मागल्या'' प्रमाणे बेशिस्त पार्किंगचा प्रकार सुरू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com