Lairai festival: अग्निदिव्य पाहण्यासाठी शिरगावात उसळला जनसागर

मध्यरात्रीपासून होमकुंड उत्सवाला प्रारंभ झाला.
Lairai festival
Lairai festivalDainik Gomantak
Published on
Updated on

Lairai festival धोंड भक्तगण आणि श्री लईराई देवीचे अग्निदिव्य तसेच हजारो भक्तांच्या साक्षीत शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. आज (मंगळवारी) पहाटे या जत्रोत्सवाची सांगता झाली.

यंदा जत्रोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जत्रोत्सवानिमित्त काल (सोमवारी) सकाळपासूनच धोंड भक्तगणांसह देवीवर अफाट श्रद्धा असलेल्या भाविकांची पावले शिरगावात वळत होती. सकाळपासूनच श्री लईराई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.

दुपारनंतर तर भक्तांच्या गर्दीत वाढ होत गेली. गोव्यासह शेजारील राज्यांतील मिळून दोन लाखांहून अधिक भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थिती लावल्याचा अंदाज आहे.

Lairai festival
Bicholim Office Burglary: डिचोलीत चोरांचा सुळसुळाट! एकाच इमारतीतील 8 कार्यालये फोडली...

आपत्कालीन यंत्रणाही तैनात

‘लईराई माता की जय’ असा जयघोष करीत हजारो धोंड भक्तगणांसह श्री लईराई देवीने पेटत्या होमकुंडातून अग्निदिव्य केले. आज (मंगळवारी) पहाटेपर्यंत हा थरार सुरू होता.

जत्रोत्सवात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अग्निशमन दल तसेच आरोग्य सेवा आदी आपत्कालीन यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.

Lairai festival
Mhadai Water Dispute: म्हादई वाचवण्यासाठी 'हा' प्रकल्प महत्वाचा, अन्यथा राज्याचे अस्तित्व धोक्यात

मध्यरात्री 2 च्या सुमारास ‘अग्निदिव्य’

भक्तांच्या हाकेला धावणारी आई आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान अशी ख्याती असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव बराच प्रसिद्ध आहे.

दिवसभर विविध पारंपरिक धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मध्यरात्रीपासून होमकुंड उत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक विधी झाल्यानंतर रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि वाजतगाजत देवीचा कळस मंदिराबाहेर काढण्यात आला.

मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने होमकुंडाला अग्नी पेटविण्यात आल्यानंतर देवीचे मुर्डी येथे प्रयाण झाले. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अग्निदिव्यास प्रारंभ झाला.

Lairai festival
Panjim News: अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे 'ही' धोक्याची घंटा

कौलोत्सवाला प्रारंभ : दरम्यान, आजपासून (मंगळवारी) शिरगावात देवी लईराईच्या कौलोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. कौलोत्सवालाही भाविक गर्दी करतात. चार दिवस गावातील प्रमुख वाड्यावर हा कौलोत्सव साजरा होणार आहे.

शुक्रवारी (ता.28) वडाचावाडा येथे कौलोत्सव साजरा झाल्यानंतर देवीच्या कळसाचे मंदिरात आगमन होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com