Agriculture News: माड बागायतीत 'श्री' पद्धतीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी

वडावल येथील बागायतदाराचा यशस्वी प्रयोग
Agriculture News
Agriculture NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Agriculture News लाटंबार्से-कासारपाल पंचायत क्षेत्रातील वडावल या गावात माडांच्या बागायतीतील मोकळ्या जागेत शेती लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला असून, सध्या ही शेती चांगली आणि पूर्णपणे बहरली आहे.

ही शेती कापणीसाठी तयार होत असून, कापणीच्या कामासाठी आणखी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. व्यवसायाने वकील असलेले प्रगतिशील शेतकरी ऍड. महेश राणे यांनी हा माडांच्या बागायतीत मोकळ्या जागेत भातशेती लागवडीचा प्रयोग केला आहे.

यापूर्वीही त्यांनी अननस, केळी आदी बागायती पीक लागवड करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

Agriculture News
Panjim News: झोपडपट्टीचे पुनर्वसन केव्हा होणार?

विषमुक्त शेती : श्री पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकी खात्याकडून उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच प्रेरणा मिळाली. विषमुक्त शेती ही संकल्पना बाळगून रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला आहे, असे शेतकरी ॲड. महेश राणे म्हणाले, ‘स्वयंपूर्ण'' आणि ''आत्मनिर्भर''बनण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्याकडे भर द्यावा.

Agriculture News
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

श्री पद्धतीने लागवड

वडावल येथे माडांच्या बागायतीत केलेली भात शेती लागवड ही ''श्री'' पद्धतीने म्हणजेच 25 सेंटीमीटर अंतर सोडून एका जागी एकच भाताचे रोप याप्रमाणे करण्यात आली आहे.

योजनेंतर्गत 6 किलो ''ज्योती'' भात बियाणे वापरून १२ हजार चौरस मीटर जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे.

डिचोलीतील कृषी अधिकारी नीलिमा गावस, सहायक कृषी अधिकारी दीपक गडेकर आणि विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जोग यांनी या शेतीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांनी या प्रयोगापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन नीलिमा गावस यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com