Mormugao : ‘एमपीए’त क्रूझ पर्यटन सुरू करा; गोवा फॉरवर्डची मागणी

समुद्र पर्यटन उपक्रम खूपच कमी प्रदूषणकारी; अर्थव्यवस्थेला होईल फायदा
Goa Forward delegation
Goa Forward delegation Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने शॅकमालक आणि कार्यकर्त्यांसह एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोद कुमार यांची मुरगाव येथे भेट घेतली. एमपीए येथे कोळसा हाताळणी बंद करण्याची आणि क्रूझ पर्यटन सुरू करण्याची मागणी केली.

समुद्र पर्यटन उपक्रम खूपच कमी प्रदूषणकारी आहेत आणि पर्यटन उद्योगासाठी फायदेशीर आहेत, ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल. क्रूझ टर्मिनल हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे जो काही काळापासून रखडलेला आहे आणि तो वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.

यामुळे बंदराचे कामकाज सुरळीत चालेल आणि या भागातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, अशा आशयाचे निवेदन आज गोवा फारवर्डच्या शिष्टमंडळाने एमपीएचे चेअरमन डाॅ.एन. विनोदकुमार यांना दिले. या शिष्टमंडळात गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, शंकर पाेळजी, जयेश शेटगावकर व इतर सदस्य उपस्थित होते.

Goa Forward delegation
Bicholim Crime News : डिचोलीतील युवतीचा विनयभंग; पोलिसांत तक्रार केल्यास मारण्याची धमकी

‘एमपीए’ मालक नाही

आरोसी, वेळसाव आणि बंदर परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवरील परवान्यासाठी एनओसी जारी करण्यासाठी एमपीएद्वारे आकारण्यात येणाऱ्या अत्याधिक शुल्काचा मुद्दाही एमपीएच्या लक्षात आणून दिला. हे क्षेत्र एमपीएद्वारे कधीही अधिग्रहित केलेले नाही. तसेच एमपीए वास्को येथील बंदराच्या सीमेपलीकडे अधिसूचित मालक नाही. त्यामुळे, एमपीएला स्थानिक बीच शॅक्सकडून परवाना शुल्क आकारण्याचा अधिकार नाही.

Goa Forward delegation
Mormugao Muncipal Council : मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; निवृत्ती वेतनधारक व कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

क्रूझ जहाजांची संख्या वाढवा

बंदरावर प्राधान्याने कोळसा हाताळणी थांबवण्याची आणि कोळसा हाताळणाऱ्या बर्थचे क्रूझ बर्थमध्ये रूपांतर करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली आहे. कोळसा हाताळणीमुळे मुरगाववासीय त्रस्त झाले असून कर्करोगसारख्या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. एमपीएने क्रूझ जहाजांची एकूण संख्या वाढविणे आवश्यक आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com