Fish Factories: मासळी कारखानेच प्रदूषणकारी !

Fish Factories: अभय केणी कुंकळ्‍ळी ‘आयडीसी’तील स्‍टील उद्योगातील प्रदूषण नियंत्रणात
Goa First Fish Dryer:
Goa First Fish Dryer:Dainik Gomantak

Fish Factories: कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत सध्‍या जे प्रदूषण होत आहे, ते मुख्‍यत: या वसाहतीतील मासळी प्रक्रिया कारखान्‍यांमुळे होत असून यातील काही कारखाने सांडपाणी थेट उघड्यावर सोडत असल्‍यामुळे या भागातील पाणी साठे दूषित झाले आहेत, असा दावा कबुली कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत उद्योजक संघटनेचे अध्‍यक्ष अभय केणी यांनी केला आहे.

Goa First Fish Dryer:
Goa Politics: सासष्टी काँग्रेसचा बालेकिल्ला हा इतिहास!

या उलट या वसाहतीतील स्‍टील उद्योगांनी आवश्‍‍यक असलेले सुरक्षेचे उपाय योजल्‍यामुळे या कारखान्‍यांतून होणारे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात असल्‍याचेही ते म्हणाले.

कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषणावर सध्‍या कुंकळ्‍ळीवासीयांनी आवाज उठविला असून ‘गोमन्‍तक’ आणि ‘गोमन्‍तक टीव्‍ही’ नेही हा विषय लावून धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर केणी यांनी कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत नेमकी काय स्‍थिती आहे, यावर भाष्‍य केले आहे.

केणी यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, कुंकळ्‍ळीत एकूण पाच मासे प्रक्रिया प्रकल्‍प असून त्‍यापैकी एकच ‘फिश मिल’ या प्रकारात मोडणारा आहे. यातील बहुतेक मासे प्रक्रिया प्रकल्‍प मासे साठवून ठेवून त्‍याची निर्यात करतात. मात्र, त्‍यातील काही कारखाने सांडपाण्‍याच्या पुनर्वापराच्‍या दृष्‍टीने आवश्‍‍यक ते उपाय घेत नाहीत आणि त्‍यामुळे या कारखान्‍यातील सांडपाणी लगतच्या शेतात मुक्‍तपणे सोडले जाते. त्‍यामुळेच प्रदूषण वाढत आहे.

Goa First Fish Dryer:
Lok Sabha Election: नरेश सावळ लोकसभा रिंगणात शक्य

पाचपैकी दोन प्रकल्पांकडूनच उपाययोजना

या पाचपैकी केवळ दोन प्रकल्‍पांनीच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्‍‍यक उपाययोजना केल्‍या आहेत. उर्वरित तीन प्रकल्‍पांनी या स्‍थितीवर नियंत्रण आणण्‍यासाठी कोणतेही उपाय केलेले नाहीत, याकडे केणी यांनी लक्ष वेधले. गोवा प्रदूषण नियंत्रणमंडळ आवश्‍‍यक मार्गदर्शन या प्रकल्‍पांना करत आहे, पण काही उद्याेगांनी मंडळाच्‍या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. काहीजण राजकीय नेत्‍यांच्या जवळीकीचा लाभ उठवून येथे मनमानी करत आहेत. कुंकळ्‍ळीवासीयांचे आरोग्‍य या कारखान्‍यांमुळे धोक्‍यात येऊ शकते, याची जाणीव ठेवून राजकारण्‍यांनी अशा उद्योगांना प्रोत्‍साहन देऊ नये ,आवाहनही केणी यांनी केले.

ओमान, इंडोनेशियाचे तंत्रज्ञान उपयुक्त !

ओमान, इंडोनेशिया यांसारख्‍या देशात मासळी प्रक्रिया प्रकल्‍प पूर्णपणे नियंत्रणाखाली चालत असून हेच तंत्रज्ञान कुंकळ्‍ळीतील उद्योगांनी वापरुन या भागात होणारे प्रदूषण नियंत्रणात आणणे शक्‍य आहे. त्‍यासाठी त्‍यांना मार्गदर्शनाची प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयारी दाखविली आहे. आमची संघटनाही या सांडपाणी विसर्जनावर नियंत्रणासाठी तांत्रिक सल्‍लागार म्‍हणून मदतीस तयार आहे. सांडपाणी प्रक्रिया करून त्‍या प्रकल्‍पांनाच पुन्‍हा वापरता येणे शक्‍य आहे. त्‍यासाठी आर्थिक मदत लागल्‍यास सरकारने त्‍यांना कर्जसुविधा द्यावी,अशी सूचना केणी यांनी केली आहे. दरम्‍यान, या वसाहतीतील स्‍टील उद्योगांनी उपाययोजना केल्‍याने प्रदूषण ९७ टक्‍के नियंत्रणात आले आहे, असा दावा केणी यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com