कुंकळ्ळीची क्रांतिगाथा अभ्यासक्रमात

गोमंतकीय इतिहासावर भर : अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्थान
Historical place
Historical placeDainik Gomantak
Published on
Updated on

विदेशी सत्तेविरुद्ध लढलेला आशिया खंडातील पहिला लढा ठरलेल्या कुंकळ्ळीच्या 1583 च्या क्रांतीच्या इतिहासाला अखेर पाठ्यपुस्तकात जागा मिळाली. यंदा अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात कुंकळ्ळीच्या क्रांतिलढ्यावर पूर्ण पाठ असणार आहे.

शिवाय पुढच्या वर्षी नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात कुंकळ्ळीच्या लढ्यावर पाठ समाविष्ट करण्यात येणार आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून अकरावी इतिहासाचे नवीन पाठ्यपुस्तक आणले असून यात गोमंतकीय इतिहासावर भर दिला आहे.

स्वधर्म व स्वराज्यासाठी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध 1583 साली कुंकळ्ळीकरांनी प्रखर लढा दिला होता. तळयेभाट-कुलवाडा-कुंकळ्ळी येथे झालेल्या रक्तरंजित क्रांतीत पाच विदेशी धर्मप्रचारकांचा बळी गेला होता.

त्याचा बदला घेण्यासाठी पोर्तुगिजांनी कुंकळ्ळीच्या 16 महानायकांना शांती वार्तेसाठी असोळणा किल्ल्यावर बोलावून त्यांची नृशंस हत्या केली होती. तेव्हापासून गोवा मुक्तीपर्यंत कुंकळ्ळीकरांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध प्रखर लढा दिला होता.

या लढ्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा म्हणून जनता सातत्याने मागणी करीत होती. अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने यावर निर्णय घेऊन गोवा शालान्त मंडळाला यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सूचना केली होती.

Historical place
Vishwajit Rane: प्रादेशिक विकास आराखड्यात कोटींचा घोटाळा- राणे

शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी खास समिती नेमून यंदाच्या शैक्षणिक वर्षात कुंकळ्ळीच्या लढ्याचा समावेश पाठ्यपुस्तकात केला. पुढच्या वर्षी नववीच्या इतिहासाच्या पाठयपुस्तकात कुंकळ्ळी उठावावर पाठ असणार आहे.

दरम्यान, कुंकळ्ळी चिफ्टन्स मेमोरियल ट्रस्टने शिक्षण मंत्रिपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, शालान्त मंडळाचे इतिहास विषयाचे अभ्यास मंडळ आणि लढ्याचा इतिहास पाठयपुस्तकात आणण्यासाठी लढणारे सुभाष वेलिंगकर आणि संबंधितांचे आभार मानले आहेत.

Historical place
Monsoon Arrives in Kerala 2023: अखेर मॉन्सून केरळच्या टप्प्यात

यांनी केले ऐतिहासिक पाठाचे लेखन

दत्ता परब, सुरेखा नाईक, आवेलीन फर्नांडिस, तिएफ कायतानो सिल्वेरा, वल्लभ केळकर, डॉ. वर्षा कामत, डॉ. सुशीला मेंडीस, बोनिता रॉड्रिग्स, गणेश गावडे, ज्योती चिपळूणकर आणि विजयकुमार कोप्रे यांच्या समितीने या पाठाचे लेखन केले आहे. इतिहास तज्ज्ञ, गोवा शालांत मंडळ प्रशासकीय समिती, मंडळ समितीने मान्यता दिल्यावर नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com