Pratima Coutinho: नावेलीतील अंगणवाड्यांची अवस्था भयानक

''निवडून आल्यावर आपली जबाबदारी संपली असे त्यांना वाटते''
pratima coutinho
pratima coutinhoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेलीतील अंगणवाड्यांची स्थिती अतिशय विदारक बनली असून सरकार त्याबाबत बेफिकीर असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या गोवा महिला विभागप्रमुख प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या, त्या असेही म्हणाल्या की, स्थानिक आमदार उल्हास तुयेकर हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही.

(The condition of Anganwadis in Navelim is terrible: Pratima Coutinho )

pratima coutinho
Vasco News: स्टॉलच्या अस्वच्छतेने भाविकांचे आरोग्य धोक्यात

यावरून ते मतदार संघाप्रती किती गंभीर आहेत, तेच दिसून येते. की निवडून आल्यावर आपली जबाबदारी संपली असे त्यांना वाटते, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. नावेलीतील रस्त्यांची अवस्था, अतिवृष्टीनंतर आलेला पूर, वाहतूक समस्या या प्रश्नांवरही आमदारांची सक्रियता कुठे जाणवली नाही, असाही ठपका कुतिन्हो यांनी ठेवला.

pratima coutinho
Goa Unemployment: बेरोजगारीने युवापिढी प्रचंड तणावाखाली - आमदार मायकल लोबो

Goa Weather Update: राज्यात जोरदार पावसाची शक्यता

पणजी: राज्यात 18 जुलैपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा जोरदारपणे पडणार आहे. उद्या शनिवारी हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शनिवारी अती पावसाचा ऑरेंज अलर्ट असून रविवारपासून तो येलोमध्ये रूपांतरित होईल. गेल्या 24 तासांत 3.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पेडणे येथे 12 मिलिमीटर झाला आहे. तर पणजीत 8.2 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. इतरत्र तुरळक पाऊस झाला. समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर राहणार असेल हा वेग वाढू शकतो असेही वेधशाळेने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com