पणजी: काही महिन्यांपूर्वी गोवा विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक कोणता विषय चर्चेत राहीला असेल तर तो म्हणजे, गोवा राज्यातील बेरोजगारी आणि यावर सत्ताधारी पक्ष काय करु शकले आणि काय करु शकले नाहीत. तसेच विरोधी पक्षांनी आपण सत्तेत आल्यानंतर राज्यातील बेरोजगारीवर काय उपाय योजणार आहोत. याच मुद्याला धरुन आज कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा सरकारवर निशाना साधला.
(MLA Michael Lobo said Goa youth under stress due to unemployment)
बेरोजगारीवर बोलताना लोबो म्हणाले की, सध्या बेरोजगारीने गोव्यातील युवापिढी प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. त्यांच्या कार्यक्षम हातांना रोजगाराची गरज असून राज्य सरकारने यामुद्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.
यावर राज्य शासनाने काय करायला हवं यावर बोलताना आमदार लोबो म्हणाले की, राज्यातील बेरोजगारीचे गांभिर्य ओळखत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उर्वरीत सगळ्या गोष्टी बाजूला सारुन सध्या रोजगाराच्या विषयावर भर देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
Rohan Khaunte : नवी अधिसूचना फायदेशीर
पणजी : नोंदणी नसलेल्या उपक्रमांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राचे नुकसान होत आहे. जलक्रीडासारख्या उपक्रमांची पर्यटन व्यावसायिक नोंदणी टाळत असल्याने राज्य सरकारचा महसूल बुडत होता, तसेच बेकायदेशीर गोष्टीही वाढत होत्या. आता पर्यटन उद्योगात सुसूत्रता येण्यासाठी केलेल्या नव्या कायद्यामुळे असे व्यवहार होणार नाहीत, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.