Bicholim News : मगरीने हिरावला तीन मुलांचा घास!

आईच्‍या मृत्‍यूनंतर झाली पोरकी : वडीलही तीन महिन्‍यांपूर्वी गेले जग सोडून
Bicholim
BicholimGomantak Digital Team
Published on
Updated on

आमठाणे धरणात मगरीच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झालेल्‍या सावरधाट-उसप येथील संगीता शिंगाडी या गरीब महिलेच्या मुलांना सरकारने आधार द्यावा व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून मयत महिलेच्या कुटुंबात सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी अखिल गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या डिचोली तालुका समितीने केली आहे.

मंडळाकडून मयत महिलेच्या मुलांना आर्थिक मदतही करण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आतापर्यंत एकाही सरकारी अधिकाऱ्यांने दुर्दैवी कुटुंबाची भेट घेतली नसल्याबद्दल मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या शनिवारी (ता. २०) तोंड धुण्यासाठी आमठाणे धरणात उतरलेल्या संगीता शिंगाडी या महिलेवर मगरीने हल्ला करुन तिला खोल पाण्यात ओढून नेले होते. या हल्‍ल्‍यात संगीता हिचा दुर्दैवी अंत झाला.

Bicholim
Panaji : पणजीतील रस्त्यावर रात्री 'नेकेड मॅन'चा वावर! फोटो सोशल मिडियावर व्हायरल

तीन महिन्यांपूर्वीच संगीता हिचे पती बाबलो यांचाही आकस्मिक मृत्यू झाला होता. मयत बाबलो आणि संगीता शिंगाडी ही शेळीपालन व्यवसायात मिळणाऱ्या कमाईतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र तीन महिन्यांच्‍या अंतराने दोघांचाही मृत्यू झाल्‍याने त्यांची तीन मुले पोरकी झाली आहेत. मुलांचा आधारच नाहीसा झाला आहे.

Bicholim
Mapusa News: महामार्ग बनलाय डंपिंग ग्राउंड! टाकाऊ साहित्य टाकताना दोन ट्रक जप्त

अंत्योदय तत्वावर वावरणाऱ्या सरकारने पोरकी झालेल्या या मुलांची व्यथा लक्षात घेऊन त्यांना आधार द्यावा, अशी मागणी अखिल गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या डिचोली तालुका समितीचे अध्यक्ष तथा स्थानिक पंच दिलीप वरक आणि सचिव लक्ष्मण लांबोर यांनी केली आहे. मयत संगीता हिचा मोठा मुलगा उमेश याने बारावी आणि आयटीआयमधून इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तर, मुलगी कविता हिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहान मुलगा भगवान हा इयत्ता दहावीत शिकत आहे.

Bicholim
Goa ST Community Reservation:...अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करू; मेळाव्यातून एसटी नेत्यांचा इशारा

गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाकडून आर्थिक मदत

गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या डिचोली तालुका समितीने काल बुधवारी मयत शिंगाडी यांच्या अनाथ मुलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. भागो भैरू वरक यांच्या नावाने सुरू केलेल्या ‘निराधारांना आधार’ योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांची आर्थिक मदतही केली. मंडळाचे अध्यक्ष दिलीप वरक आणि सचिव लक्ष्मण लांबोर यांनी हा धनादेश शिंगाडी यांच्या मुलांकडे दिला. यावेळी खजिनदार सगुण गवळी, नीलेश ताटे, धाकटू शिंगाडी, सुनील वरक, चंद्रकांत झोरे, सगुण वरक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com