Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

Goa CM Dr. Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील तथाकथित दोन लाख नोकऱ्यांच्या संधींचा तपशीलवार माहिती देऊन दावा सिद्ध करावा.
Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील तथाकथित दोन लाख नोकऱ्यांच्या संधींचा तपशीलवार माहिती देऊन दावा सिद्ध करावा. गोव्यातील नोकऱ्या बाहेरचे लोक येऊन बळकावतील, अशी धमकी देण्याऐवजी केवळ गोमतकीयांचीच सरकारी किंवा खासगी क्षेत्रात भरती व्हावी, यावर सरकारने उपाययोजना करावी,असे आवाहन कॉंग्रेसने केले आहे.

काँग्रेसचे मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, एनआयटी, आयआयटी, बिट्स पिलानी, आयुर्वेद संस्था, युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये किती गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या? किती कायमस्वरूपी आहेत, किती तात्पुरत्या आहेत, किती आउटसोर्स एजन्सीद्वारे आहेत? याची उत्तरे प्रथम मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी द्यावीत, नंतरच गोमंतकीयांना थिवी येथील प्रस्तावित खासगी विद्यापीठाला विरोध करू नये, असे आवाहन करावे, असा सल्ला काँग्रेसने दिला आहे.

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल
Goa Politics: निकृष्ट रस्त्यांना माजी मंत्रीच जबाबदार! मुख्यमंत्र्यांचे शरसंधान; उच्चाधिकार समिती बैठकीत 27 कंत्राटदारांचे परवाने निलंबित

एनआयटी (कुंकळ्ळी) मधील १९५ नोकऱ्यांपैकी फक्त १३० गोमंतकीय असून, त्यापैकी फक्त १५ नियमित आणि ११२ आउटसोर्स केलेल्या आहेत. फार्मगुडी येथील आयआयटीमध्ये, ३२९ नोकऱ्यांपैकी फक्त १४० गोमंतकीय आहेत आणि त्यापैकी फक्त १४ नियमित आहेत. धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये २२० नोकऱ्या आहेत त्यापैकी २०४ गोमंतकीय केवळ कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत.

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल
Goa Politics: 'गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांची यादी द्या...'; बाबू कवळेकरांचा एल्टन यांच्यावर हल्लाबोल

इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चला सरकार ५० एकर जमीन देऊ इच्छित आहे. या संस्थेकडे फक्त ४४ नोकऱ्या आहेत ज्यात ११ गोमंतकीय कंत्राटी तत्वावर काम करतात. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ३७८ नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यापैकी ५३ गोमंतकीय नियमितपणे, ४३ कंत्राटी पद्धतीने आणि १९६ थर्डपार्टी एजन्सीद्वारे कार्यरत असल्याचा दावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com