Sanquelim Municipal Elections 2023: साखळीत सर्वच उमेदवारांनी साधला ‘सुपर संडे’

प्रचाराचा धुरळा : सुट्टीच्‍या दिवशी वैयक्तिक गाठीभेटींवर भर; काहींचे शक्तीप्रदर्शन
Sanquelim Municipal Elections
Sanquelim Municipal ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipal Elections 2023: दि. 5 मे रोजी होणाऱ्या साखळी नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा जोर दिवसेंदिवस बराच वाढत आहे. मतदानापूर्वी आजचा अंतिम रविवार (दि. 30 एप्रिल) सर्व उमेदवारांसाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्‍यासाठी उपयुक्त ठरला.

त्यामुळे या सुट्टीच्या दिवसाचा सर्वच उमेदवारांनी पुरेपूर लाभ उठवत प्रचार केला. ‘सुपर संडे’ ठरलेल्या प्रचाराच्या या दिवशी अनेकांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शनही केले.

साखळी पालिकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण सर्व प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती होण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

भाजप गटाने पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेताना सर्व पातळ्यांवर आघाडी मिळविण्याचे प्रयत्न केले. त्यांचा प्रचारही पद्धतशीरपणे सुरू आहे.

तर भाजपला थेट आव्हान दिलेल्या ‘टुगेदर फॉर साखळी’चे उमेदवार हे वैयक्तिक पातळीवर आपला प्रचार करीत आहेत. गेली दहा वर्षे या पालिकेवर सत्ता चालविताना केलेल्या कामांचा संदर्भ देऊन त्यांचा प्रचार सुरू आहे.

Sanquelim Municipal Elections
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

या प्रचार आज रविवारी बराच जोर आला. रविवारची सुट्टी असल्याने बहुतेक लोक आपापल्या घरी निवांत असतात. याच संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी ‘सुपर संडे’ साधला.

येत्या शुक्रवारी मतदान होणार असून त्यापूर्वी सुट्टीचा हा एकच रविवार सर्व उमेदवारांच्या पदरी पडला.

प्रत्येक उमेदवाराने घराघराला भेटी देऊन मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधला व मतदान करण्याचे आवाहन केले.

भाजप गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध नेते, प्रभारी, निरीक्षकांनी कोपरा बैठका घेऊन मतदार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Sanquelim Municipal Elections
Ponda Municipal Elections 2023: शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत; 3 प्रभागांमध्ये ‘कांटे की टक्कर’

रखरखत्‍या उन्‍हात प्रचार

सध्या कडक उन पडते. तसेच उकाडाही बराच असल्याने उमेदवार सकाळच्या वेळी म्‍हणजेच दुपारी 12 पूर्वी तर संध्याकाळी 4 नंतर प्रचाराला घराबाहेर पडतात.

परंतु इतर दिवसांमध्ये काही खासगी कंपन्यामध्ये कामाला जाणारे कामगार उमेदवारांना भेटींसाठी सापडत नव्हते. अशा कामगारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी रविवारची संधी साधली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com