मान्द्रेतून भाजपचा उमेदवार अजूनही निश्चित नाही: माजी मुख्यमंत्री पार्सेकर

मांद्रे मतदार संघाची (Mandre Constituency) उमेदवारी अजून कुणालाही जाहीर झालेली नाही, कुणी नारळ ठेवला म्हणून हरकत नाही.
Ex.CM Laxmikant Parsekar
Ex.CM Laxmikant ParsekarDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मांद्रे मतदार संघाची (Mandre Constituency) उमेदवारी अजून कुणालाही जाहीर झालेली नाही, कुणी नारळ ठेवला म्हणून हरकत नाही. मात्र अजून पर्यंत भाजपची उमेदवारी पक्षाने कुणालाच दिली नाही, मात्र ती आपल्यालाच मिळणार असा आशावाद माजी मुख्यमंत्री प्रा. (Ex.CM Laxmikant Parsekar) लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी व्यक्त केला. मांद्रे मतदार संघातील भाजपच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर आणि विद्यमान आमदार दयानंद सोपटे या दोघांनीही आपल्यालाच मिळणार असा दावा केला आणि दोन्ही भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याच पाश्वभूमीवर विद्यमान भाजपचे आमदार दयानंद सोपटे यांनी 8 रोजी पार्से येथे हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री भगवती देवीला श्रीफळ अर्पण करून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली. जनसंपर्क मोहिमेंतर्गत आमदार दयानंद सोपटे यांनी थेट आपल्या विरोधकाना शक्तीप्रदार्षानातून एक सणसणीत चपराक देण्याचा प्रयत्न केला.

अधिकृतपणे भाजपने एकही उमेदवाराला आजपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही. मात्र आमदार दयानंद सोपटे यांनी तर आपल्या प्रचाराला सुरुवात करताना हजारो समर्थक उभे केले. एक प्रकारे ८ रोजी आमदार सोपटे यांनी प्रचारालाच सुरुवात केली आहे. त्याच पाश्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीचे दुसरे दावेदार असलेले माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांच्याकडे संपर्क साधला तर त्यांनी सरळ सांगितले अजून पक्षाने कुणालाच उमेदवारी जाहीर केलेली नाही, कुणी नारळ ठेवला तर आपळी त्याला हरकत नसल्याचे सांगितले.

Ex.CM Laxmikant Parsekar
शिरगाव पंचायतीच्या सरपंचपदी भगवंत गावकरांची फेरनिवड

आपण भाजपच्या कार्यात मागची ३० वर्षे कार्यरत आहे, पक्षाचा सचिव राज्याचा सरचिटणीस तीन टर्म, राज्याचा अध्यक्ष दोन टर्म पक्षाचा आमदार तीन टर्म व मंत्री आणि मुख्यमंत्री होतो, पक्षाची तिकीट कशी जाहीर होते हे आपण जवळून पहिले, पार्लमेंटरी बोर्ड असतो. तो दिल्हिला बसतो आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर, आता आपल्याला माहित नाही, पार्लमेंटरी बोर्ड न बसता आणि निवडणूक जाहीर न होताच मान्द्रेची उमेदवारी दिली हि अफवा का पसरवली जाते ते माहित नाही. परत देवाला नारळ आणि गाऱ्हाणे घालायला आपली हरकत नाही असा टोला माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मारला. मागचा आठवडाभर आपण ऐकत आलो, नारळ ठेवणार म्हणून कार्यकर्त्यांची जमवा जमाव, शेजारच्या मतदार संघातील कार्यकर्त्याना उपस्थित राहण्यासाठी आग्रह केला जात होता आपल्यालाही अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. तिकीट दिली ग्रीन सिंग्नल दिले तर हे धांदात खोटे असा दावा पार्सेकर यांनी केला.

अडथळे असल्याने लवकर तयारी

ज्याला दूरवरचा पल्ला गाठायचा असतो त्याला लवकर तयारी करायची असते, ज्याना वाटेत अडथळे आहे असे वाटते तेच तयारी करतात. चाळीस मतदार संघात प्रत्येकजण देवाला गाऱ्हाणे घालत असतील मात्र भाजपच्या एकही उमेदवारांनी किंवा आमदारांनी प्रचाराचा नारळ ठेवलेला नाही, त्यांनी का ठेवला ते त्यालाच माहित असे पार्सेकर म्हणाले त्यांनी नारळ फोडला तरीही आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे ते म्हणाले.

गोरख मांद्रेकर यांचे नंबर बदलतात ?

भाजपाचे मांद्रे मतदार संघाचे निरीक्षक गोरख मांद्रेकर यांचे नंबर कसे काय चुकतात ते आपल्याला माहित नाही, ते कधी म्हणतात मायकल लोबो हे राज्यातील चाळीशी आमदारापैकी कलंगुटचा आमदार विकासाला नंबर वन आहे आज पर्से येथे मांद्रेकर म्हणतात कि मुख्यमंत्री सावंत हे नंबर वन आणि दोन नंबरवर मांद्रे मतदार संघाचे [ आपण त्या आमदाराचे नावही घेत नाही ] आमदार हि गणिते मान्द्रेकारांची कशी बदलतात हे आच्छर्य वाटते मागे एकदा अशेच आपण मुख्यमंत्री असताना गणित मांडले होते त्यातून ते अडचणीत आले होते त्यतून आपणच त्याला सोडवले असे पार्सेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com