Arrested Accused by the Anti-Narcotics Department
Arrested Accused by the Anti-Narcotics DepartmentDainik Gomantak

Goa Police : चार लाख रुपयांच्या ड्रग्जसह एक अटकेत; अमली पदार्थविरोधी विभागाची कारवाई

1.5 किलो गांजा आणि 15 ग्रॅम एमडीएमए जप्त
Published on

Goa Police : अमली पदार्थविरोधी विभागाने नागवे, बार्देश येथे केलेल्या धडक कारवाईत राजस्थानातील एकाला सुमारे चार लाख रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली. हडमना राम उर्फ हनुमान (वय 32 वर्षे) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडे 1.5 किलो गांजा आणि 15 ग्रॅम एमडीएमए सापडले.

Arrested Accused by the Anti-Narcotics Department
Online Fraud: पाच एटीएम हॅक प्रकरणाचा पर्दाफाश; एकाला अटक

अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई २४ रोजी मध्यरात्री करण्यात आली. एएनसी विभागाचे अधीक्षक शिवेंदू भूषण आणि उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर, हवालदार अनय नाईक, प्रमोद कळंगुटकर, कॉन्स्टेबल नितेश मुळगावकर आणि प्रभू मडीवलार यांच्या पथकाने ही माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला.

हडमना राम उर्फ हनुमान हा जेव्हा दुचाकीवरून नियोजनानुसार ठरलेल्या ग्राहकासाठी ड्रग्स घेऊन येत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्याकडून ड्रग्जसह 7,200 रुपये रोख आणि दुचाकीही जप्त केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गारूडी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com