Online Fraud: पाच एटीएम हॅक प्रकरणाचा पर्दाफाश; एकाला अटक

नऊ लाख केले होते लंपास : संशयिताला सात दिवसांची कोठडी
Online Fraud
Online FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Online Fraud : ‘आरबीएल’ या एकाच बँकेच्या पणजी, म्हापसा आणि कळंगुट येथील पाच एटीएम हॅक करून सायबर चोरांनी तब्बल 9 लाखांवर डल्ला मारला होता. अखेर गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा चार महिन्यांनंतर पर्दाफाश केला. मेवात, हरियाणा येथील मुबारक मोहम्मद याला याप्रकरणी अटक केली आहे.

संशयिताला पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे अधीक्षक शिवेंदु भूषण यांनी दिली. पणजीतील पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे प्रकरण ऑक्टोबर 2022 मध्ये घडले होते. रत्नाकर बँक लिमिटेडच्या (आरबीएल) वतीने मुंबई येथील व्यवस्थापकांनी रायबंदर येथील सायबर गुन्हे विभागात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

Online Fraud
Lok Sabha Elections 2024 : दोन्ही मतदारसंघांत चुरस

पणजी, म्हापसा, कळंगुट येथे निर्जनस्थळी असलेले एटीएम अज्ञातांनी हॅक केली होती. तक्रारीनंतर सायबर विभागाने याचा तपास सुरू केला. त्यात दोन संशयित व्यक्ती एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या होत्या.

माहिती घेतल्यावर संशयित व्यक्ती मेवात, हरियाणा येथील असल्याचे सिद्ध झाले. या दोघांना पकडण्यासाठी जानेवारीमध्ये पोलिस पथक रवाना झाले होते. मात्र, मेवात जिल्ह्यातील लुईंगा कलन गावात जाण्यासाठी सशस्त्र पोलिस वाहनांची आवश्‍यकता होती. परंतु, शोधकार्यास स्थानिक पोलिस सहकार्य करत नसल्याने सात दिवसांनंतर पोलिस पथक गोव्यात परतले, असे भूषण यांनी सांगितले.

मेवात, जमतारा, भरतपूर गुन्हेगारी केंद्रे

पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असले तरी चोरीस गेलेली रक्कम मिळालेली नाही. मेवात, जमतारा, भरतपूर ही ठिकाणे सायबर गुन्ह्यांसाठी हॉट स्पॉट बनली आहेत. मुख्य म्हणजे येथील लोक गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याने तेथे सहजपणे अशक्य आहे.

स्थानिक पोलिसांनाही तेथे कारवाई करणे अवघड जाते. तेथे जाण्यासाठी सशस्त्र पोलिस वाहनांची आवश्‍यक असते, अशी माहिती भूषण यांनी दिली.

Online Fraud
‘ईडीसीचा 2021-22 चा नफा 52.47 कोटी’

पाळत ठेवून संशयितावर झडप

संशयितांची माहिती मेवात पोलिसांना दिल्यानंतर त्या दोघांवर पाळत ठेवली होती. मेवात पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गोव्यातील पथक पुन्हा मेवातला गेले. हे संशयित गावातून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत पथक होते.

अखेर 20 फेब्रुवारी रोजी एक संशयित मुबारक गावाच्या हद्दीतून बाहेर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मेवात पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असून जटील प्रकरणात गोवा पोलिसांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल भूषण यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सुरक्षा रक्षक नसल्याने चोरांचे फावते

विशेष करून निर्जनस्थळी असलेल्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक असणे महत्त्वाचे आहे. गोव्यातील बँकांना एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याबद्दल पोलिसांनी सूचना केली आहे. परंतु याची अंमलबजावणी केली जात नाही. जास्त करून दक्षिण गोव्यात एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com