आम्हालाही मोफत बससेवा द्या!

गोव्यातील महिलांची मागणी : महाराष्ट्र, कर्नाटकमधील सरकारच्या निर्णयाचे पडसाद
Bus Service
Bus ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

Free Bus Service गोव्यात 70 टक्के नागरिक रोज बसप्रवास करतात. त्यात महिलावर्गाचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आज प्रत्येक महिला आपला कामधंदा व इतर कामे करत आहे. महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यात महिलांना एसटी प्रवासांत 50 टक्के सूट मिळवून दिली आहे.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे कर्नाटकमधील महिलांना मोफत बसप्रवास जाहीर केला आहे.

कर्नाटक व महाराष्ट्रातील सरकारने आपआपला राज्यात ही सेवा जाहीर करून महिलांना एक व्यासपीठ तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी मोठी हातभार लावला आहे.

या राज्यांत मोफत सेवा देऊ शकतात तर गोवा तर छोटे राज्य आहे. त्यामुळे आम्हालाही मोफत बससेवा जाहीर करावी, अशी गोव्याबरोबर व सत्तरीतील तमाम महिलावर्गाची मागणी आहे.

Bus Service
Goa Dairy Milk : गोवा डेअरीची स्‍थिती ‘संजीवनी’सारखी!

आत्मनिर्भर भारत व संपूर्ण गोवा अंर्तगत दिवसेंदिवस महिलांसाठी नवनवीन योजना आखल्या जात आहेत. त्यात महिलांना प्रोत्साहन व सक्षम बनविण्याचा उद्देश असल्याचे समजते. मात्र, हे सर्व करत असताना जर सरकारने महिलांचा विचार करून गोव्यातही अशा प्रकारची योजना आखली तर चांगले होईल.

आज भाजप सरकारवर सर्वांचा विश्वास आहे. त्यात खासकरून महिलांच्या सहकार्यामुळेच व विश्वासामुळे हे सरकार निवडून आले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

त्यामुळे महिलांना खूश करण्याची ही चांगली संधी सरकारकडे आहे. आज जर महिलांना अशारितीने ही योजना आखून खूश केले तर येणाऱ्या निवडणुकीत सरकारला मतांसाठी जास्त मेहनत करण्याची गरज भासणार नाही.

Bus Service
Goa School : राज्यातील सर्व शाळा 5 जूनपासून होणार सुरू

गोव्यात अशा योजना आखणे गरजेचे आहे. अशाप्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली तर महिलांना आर्थिकदृष्ट्या फायद्याचे होईल. गोवा लहान राज्य आहे, त्यामुळे अशी योजना सुरू करण्यासाठी सरकारला मोठी अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे सरकारने या प्रस्तावाचा विचार करायला हवा.

- अविता गावकर, सावर्शे, खासगी नोकरदार

आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलावर्ग जास्त प्रमाणात बसमधून प्रवास करत आहे. आमच्यासारख्या सामान्य माणसांना काही वेळेला बसचाही प्रवास परवडत नाही. त्यामुळे सरकारने मोफत बससेवा सुरू करावी, अशी माझी मागणी आहे.

- सुलोचना नाईक, ठाणे-सत्तरी, गृहिणी

आज पुरुषांबरोबर महिलाही खांद्याला खांदा टेकून पुढे जात आहेत. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा विचार केला तर महिला समाजात सुरक्षित नाहीत. त्यामुळे सरकारने बससेवा मोफत देताना खास महिला प्रवासी बससेवा सुरू केली पाहिजे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार नाही.

- सुजाता नायक, वेळूस-वाळपई, रोजदांरीवर काम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com