काैतुकास्पद, अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा वास्को पोलिसांनी लावला छडा

वास्को पोलिसांनी मुंबईतून आरोपींना घेतले ताब्यात
abduction of a minor was carried out by Vasco police within 24 hours
abduction of a minor was carried out by Vasco police within 24 hoursDainik Gomantak
Published on
Updated on

एका 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाचा 24 तासांच्या आत छडा लावण्यास वास्को पोलिसांना यश आले. आरोपी दीपक यादव (लंगडा) व श्रीमती काणी या दोघा आरोपींना माहीम मुंबई येथे मुलासह ताब्यात घेतले व त्यांना अटक करण्यात आली. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वास्कोत साईबाबा मंदिराजवळ फूटपाथवर राहणाऱ्या उत्तर कर्नाटकातील एका महिलेने काल पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी 11 रोजी 5 ते 4:30 च्या दरम्यान दीपक यादव ( लंगडा) आणि काणी या वास्को येथे फूटपाथवर राहणाऱ्या दोघा आरोपींनी तिच्या ताब्यातून तिचे 11 महिन्याच्या बाळाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. (abduction of a minor was carried out by Vasco police within 24 hours)

abduction of a minor was carried out by Vasco police within 24 hours
दूध सागर टूर ऑपरेटर्स स्टॅन्डचे होणार सुशोभीकरण, 2 कोटींच्या निधीची घोषणा

त्यानुसार वास्को पोलिसांनी कलम 363 आणि गोवा अधिनियम कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. अपहरण झालेल्या मुलाच्या संबंधात काही सुगावा लागला व आरोपीच्या शोधासाठी एक पथक मुंबईला पाठवण्यात आले. पोलिस उपअधिक्षक गुरुदास कदम यांच्या देखरेखीखाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर, हेड कॉन्स्टेबल आशिष नाईक, सचिन बांदेकर, एलपीसी रवीना शाहपुरकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सनिल बावळेकर हे पथक माहीम मुंबई येथे जाऊन पायधोनी पोलीस स्टेशन महाराष्ट्र यांच्या मदतीने दोन्ही आरोपींचा शोध घेतला.

ते माहीम रेल्वे स्थानकाबाहेर पीडित मुलाला घेऊन भीक मागत असलेले दृष्टिपथास पडले. मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर वास्को पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पीडित बालक आणि दोन्ही आरोपीसह टीम गोव्यात रवाना झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, वास्को पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर आणि उपअधीक्षक श्री गुरूदास कदम यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com