Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDanik Gomantak

दूध सागर टूर ऑपरेटर्स स्टॅन्डचे होणार सुशोभीकरण, 2 कोटींच्या निधीची घोषणा

कुळे बाजारकरांची पंचायतीची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव
Published on

धारबांदोडा : पर्यटन विकास महामंडळातर्फे दोन कोटी रुपये खर्चून कुळे येथील दूध सागर टूर ऑपरेटर्स स्टॅण्डचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. येथील दूध सागर पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जीप गाड्या पार्क करण्यासाठी जागा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी दिली.‌

मायडा-कुळे येथील रेल्वे कॉलनीत असलेल्या दूधसागर ईश्वर मंदिराचे सुमारे आठ लाख रुपये खर्चून दक्षिण गोवा जिल्हा पंचायततर्फे सुशोभीकरण करण्याच्या कामात प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. कुळे बाजारकरांची मान्यता असल्यास पंचायतीची जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे.

Dudhsagar Falls
फुकटात काही मिळणार नाही; स्वच्छ, नितळ गोव्यासाठी जनतेने शिस्त पाळावी : मुख्यमंत्री

सर्व दुकानदारांचे हित लक्षात घेऊन ही इमारत पर्यटन विकास महामंडळातर्फे बांधण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव सादर केल्यास योग्य तो निर्णय घेऊ असे आमदार गावकर म्हणाले. गेल्या दीड वर्षात जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम करताना आपण सुमारे एक कोटीची विकास कामे मार्गी लावली आहेत.

यासाठी बारा निविदा काढण्यात आल्या. यात महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्वयंसहाय्य गटांना शिलाई मशिन देण्यात आली आहेत. पाच देवस्थानांना खुर्च्या देण्यात आल्या असून, अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड कापण्यासाठी चार वूड कटर मशिन देण्याचा प्रस्ताव आहे. इच्छुक संस्थांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य सुद्धा गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com