Mahadayi Water Dispute: 'सेव्ह म्हादई' सभेबाबतची गोवा पोलिसांची 'ती' कृती सर्वस्वी चुकीचीच

क्राइम सेलची ही कृती नागरिकांच्या हक्काच्या, चळवळीच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

गोव्यात सध्या म्हादई प्रश्न बराच तापला आहे. सत्ताधाऱ्यांना म्हादई प्रश्नी विरोधक कोंडीत पकडत आहेत. राज्यातील सर्व मतदार संघात म्हादई विषयी जनजागृती व्हावी, आंदोलनाला बळकटी यावी यासाठी काँग्रेसने 'हाथ से हाथ जोडो' अभियानाला प्रारंभ केलाय. साखळी येथील सेव्ह म्हादईच्या सभेसाठी काँग्रेससह विरोधक एकवटले होते. याच विषयी अॅड कार्लोस यांनी गोवा पोलिसांच्या क्राइम सेलविषयी एक विधान केलंय. (Mahadayi Water Dispute)

गोवा पोलिसांच्या क्राइम सेलची विशेष शाखा साखळी येथील सेव्ह म्हादईच्या सभेसाठी लोकांना घेऊन गेलेल्या बसच्या मालकांना फोन करून त्यांना बस कोणी बुक केली होती, सर्व प्रवासी कोण होते इत्यादी तपशील विचारत असल्याची खळबळजनक बातमी समोर आणली आहे.

Mahadayi Water Dispute
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर बनावट तिकीटाप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक

गोवा पोलिसांच्या क्राइम सेलची ही कृती सर्वस्वी चुकीची आहे. अशा प्रकारचे पोलिसिंग करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या हक्काच्या, चळवळीच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पोलिसांनी राजकीय दबावापुढे झुकणे बंद करावे. मी या संबंधी डीजीपींना पत्र लिहिणार असून असा कोणताही आदेश जारी झाला आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे असे अॅड कार्लोस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com