व्हॉटसॲप कॉलमुळे गोव्याच्या इसमाची ‘नो मॅन्‍स लॅण्ड’वरून सुटका; सांगितले होते डेटा एंट्रीचे काम अडकला 'क्रिप्टो' रॅकेटमध्ये

Crypto Currency Racket: या प्रकरणात फसलेल्‍या आशिष वाघ या राय येथील इसमाला दक्षिण गोवा पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले
Crypto Currency Racket: या प्रकरणात फसलेल्‍या आशिष वाघ या राय येथील इसमाला दक्षिण गोवा पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले
Fraud, ScamCanva
Published on
Updated on

मडगाव: थायलंडमध्‍ये ‘डाटा एन्‍ट्री’चे काम करण्‍याची संधी आहे, असे सांगून भारतातील कित्‍येकांना म्यानमार देशातील ‘नो मॅन्‍स लॅण्ड’वर नेऊन डांबून ठेवून त्‍यांना क्रिप्‍टो करन्‍सी व्‍यवहारामध्‍ये काम करण्‍याची सक्‍ती करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात फसलेल्‍या आशिष वाघ या राय येथील इसमाला या टोळीच्‍या तावडीतून दक्षिण गोवा पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले.

याप्रकरणी आशिष यांची पत्‍नी पूनम यांनी मायणा-कुडतरी पाेलिसांत तक्रार दिली होती. मडगावातील जुन्या मार्केटमधील हेजल फर्नांडिस या युवतीने तिच्‍या पतीशी संपर्क साधून थायलंडमध्‍ये रोजगाराची संधी आहे, असे सांगितले. गून त्याला थायलंडमध्‍ये न नेता म्यानमारच्‍या सीमेवर नेऊन क्रिप्‍टो करन्‍सीच्‍या व्‍यवहारात काम करण्‍याची सक्‍ती केली. त्‍याच्‍याबरोबर २० भारतीयांनाही अशा कामात गुंतविले होते.

आशिष वाघ यांची या टोळीच्‍या तावडीतून सुटका केल्‍यानंतर सोमवारी त्‍यांना भारतात आणले. वाघ हे कुटुंबीयाला भेटले, अशी माहिती दक्षिण गोव्‍याच्‍या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. दरम्‍यान, अशा तरेची बोगस भरती यंत्रणा संपूर्ण देेशात चालू असून अशाप्रकारच्‍या आमिषाला लोकांनी बळी पडू नये असे आवाहन अधीक्षक सावंत यांनी केले आहे.

Crypto Currency Racket: या प्रकरणात फसलेल्‍या आशिष वाघ या राय येथील इसमाला दक्षिण गोवा पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले
MMC Margao Scams: मडगाव नगरपालिकेत घोटाळ्याची नवनवीन प्रकरणे

...अन् सुटकेचा मार्ग सापडला

वाघ यांच्‍या सुदैवाने त्यांना कुणाचा तरी माेबाईल सापडला आणि त्‍यांनी पत्‍नी पूनमशी व्हॉटस्‌ ॲप कॉलवरून संपर्क साधून आपल्‍याला कोणत्या परिस्‍थितीला सामोरे जावे लागते, याची माहिती दिली. त्‍यानंतर पूनम यांनी मायणा-कुडतरी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून ज्‍या क्रमांकावरून वाघ यांनी फोन केला हाेता, त्‍याची माहिती पुरविली. त्‍यानंतर परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने या फोन नंबरच्‍या माध्‍यमातून चौकशी करत म्यानमारच्‍या सीमेपर्यंत पोचून सर्व भारतीयांची सुटका केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com