keri Beach: मांद्रे मतदारसंघातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केरी-तेरेखोल गावाच्या उत्कर्षात अनेक गोष्टींचा समावेश आहे. तेरेखोल नदी व बीचच्या ठिकाणी असलेल्या सुरूच्या बागेमुळे देश-विदेशातील पर्यटक येथे भेटी देत असतात.
अशा किनाऱ्याच्या संरक्षणासाठी ‘टेट्रा पॉड’ची संकल्पना घातक बनली आहे. यावर १७ कोटी खर्चून काम होणार म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची स्थानिक नागरिकांची तीव्र भावना बनली आहे.
या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी गेल्या १० वर्षांत अंदाजे ७० कोटी रुपये खर्च आल्याची माहिती सूत्रांकडून समजते. वास्तविक किनाऱ्याचे संरक्षण काळाची व ग्रामस्थांची गरज आहे व ग्रामस्थांनी जबाबदारी ओळखून प्रस्तावित कामाला विरोध केल्याचे व्यावसायिक तथा समाजकार्यकर्ते विलास आरोलकर यांनी सांगितले.
ज्यावेळी केंद्रीय जलस्त्रोत खात्यामार्फत या कामाची निविदा स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात न घेता काढण्यात आली. कामही पूर्ण केल्याचे दिसत आहे.
मात्र, त्याचा परिणाम आज स्थानिकांना भोगावा लागत असल्याचे स्पष्ट आहे. ‘टेट्रा पॉड’ ही आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञानयुक्त उपाययोजना असल्याचा दावा संबंधित खात्याने केला होता. त्याची तर्कशुद्धता किती शास्त्रीय होती, हे दिसून आल्याचे आरोलकर यांनी सांगितले.
एक फसलेला प्रयोग
समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण काळाची गरज असून, नवनवीन पद्धतीचा अवलंब होत आहे. टेट्रा पॉडमुळे लाटांच्या तडाख्याने पॉडखालील माती वाहून जाते, पॉड वाळूत जातात व भरतीच्या वेळेत वाळूचे थर, पॉड वा सिमेंट लाद्यांवर होतात व नंतर संरक्षक भिंत वाहून जाते. पदपथ खचला असून किनारा नष्ट होत आहे, असे आरोलकर यांनी सांगितले.
पैशांची उधळपट्टी नको
या किनाऱ्यावर टेट्रा पॉडचे काम केल्याने ८० किनारा वाहून गेला असून, आता शिल्लक जागेत टेट्रा पॉड घातल्यास संपूर्ण किनाराच नामशेष होईल.
सध्या प्रस्तावित संरक्षक भिंतीचे काम न करणे, काळाची गरज असून त्यापेक्षा एखादी सुविधा व कंपनी स्थापन करून रोजगार संधी उपलब्ध करता येते. पैशांची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आरोलकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.