Goa Drug Case: हैदराबादनंतर केरळ ड्रग्स कनेक्शन उघडकीस

Goa Drug Case: एर्नाकुलम पोलिस आज येणार हणजुणेत
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak

Goa Drug Case: हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गोवा हा अमली पदार्थ व्यापाराचे मोठे केंद्र असल्‍याची माहिती पुढे आल्यानंतर आता अमली पदार्थ व्यापारातून केरळमधील युवकाचा आसगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याचे केरळ पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या तपासासाठी एर्नाकुलम पोलिस उद्या हणजुणेत येणार आहेत.

Goa Drug Case
Goa Politics: निवडणुकीसाठी सत्ताधारी राज्यांचा भाजपकडून ‘एटीएम’ म्हणून वापर

खून झालेल्या युवकाचा सांगाडा हणजूण पोलिसांना सापडला होता. केरळमधील जेफ लुईस (वय २७ वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नोव्हेंबर २०२१ पासून बेपत्ता असल्याची तक्रार केरळ पोलिसांत नोंद आहे. जेफ हा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता आणि सातत्याने गोव्यात ये-जा करत असे. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याची आई ग्लाडीस यांनी एर्नाकुलम पोलिसांत तक्रार दिली होती.

पोलिस एका सराईत गुन्हेगाराची चौकशी करत असताना त्याच्या गॅंगने गोव्यात जेफचा खून केल्याची कबुली दिली. त्याची खातरजमा करण्यासाठी केरळ पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला असता, हणजुणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक सांगाडा सापडल्याची माहिती देण्यात आली. तो मृतदेह जेफचाच असल्याची खात्री पटल्यानंतर या प्रकरणात अनिल चाको, स्टेफीन थॉमस आणि विष्णू टी. व्ही. अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी प्राथमिक चौकशीत अमली पदार्थ व्यापारातून झालेल्या भांडणातून जेफला मारल्याचे कबूल केल्याने आता तपासासाठी एर्नाकुलम पोलिस हणजुणेत येणार आहेत.

Goa Drug Case
Ganesh Chaturthi 2023: ढवळी येथे यंदा प्रथमच चतुर्थी बाजाराचे आयोजन

खून करुन मोबाईल, सीमकार्ड केले नष्ट

पोलिसांनी अनिलला अटक केली. त्याने अमली पदार्थ व्यापारातील देवघेवीवरून जेफला मारून त्याचा मोबाईल आणि सीमकार्ड नष्ट केल्याचे सांगितले. त्यानंतर त्या प्रकरणाचा तपास कोची शहर पोलिस करू लागले. त्यांनी हणजुणे पोलिसांशी संपर्क साधून मिळालेला सांगाडा सांभाळून ठेवण्याची विनंती केली आहे. केरळ पोलिस आता गोव्यात झालेल्या खुनाचा तपास करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com