फातोर्डा : पावसाळ्यात लोकांना अनेक साथीच्या रोगांची लागण लागलेली आढळते. अशा रोगांच्या विरुद्ध मडगाव नगर आरोग्य केंद्राने (health center) प्रतिबंधात्मक उपाय योजिले असुन केंद्राचे कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासुन याच कामात गुंतलेले आहेत असे केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजू खरंगटे (Dr. Anju Kharangate) यांनी या प्रतिनिधिला सांगितले.यंदा मलेरिया (Malaria) व डेंग्युचा (Dengue) मडगावात (Margao)एकही रुग्ण सापडला नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. (testified that no cases of malaria and dengue were found in Margao)
बांधकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी, पोलिसांना, कदंब बस कचेरी अशा सार्वजनिक ठिकाणी लावणयासाठी दिर्घकाळ टिकणारी किटकनाशक जाळ्या (एलएलआयएन) केंद्रामार्फत देण्यात आली आहेत. शिवाय कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन पाणी सांडलेल्या ठिकाणी तसेच घाणअसलेल्या सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक औषधाचे फवारे मारत आहेत. शिवाय नागरिकांमध्ये रोगांबद्दलची जनजाग्रती करण्याचे कामही चालु आहे. केंद्रातर्फे पाच कर्मचाऱ्यांची एक अशा दहा तुकड्या सद्या शहर व आसपासच्या भागात कार्यरत आहेत असेही डॉ. खरंगटे यांनी सांगितले.हॉस्पिसियो, दक्षिण गोवा (Goa ) जिल्हा तसेच ईएसआय व इतर सरकारी आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांची वेळच्या वेळी तपासणी होत असते असेही डॉ. खरंगटे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.