

वास्को: उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत ‘निओगी मॅन्शन’ पाडण्याचे आदेश दिल्यानंतर वास्कोतील या ऐतिहासिक वास्तूतील भाडेकरू, रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाडकामाची तयारी सुरू होताच अनेक जणांनी घाईघाईने आपले साहित्य हलविण्यास सुरुवात केली.
भाडेकरूंच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून इमारत रिकामी करण्यास सांगितल्यानंतरच त्यांना या कायदेशीर प्रक्रियेची माहिती मिळाली. इमारतीच्या भवितव्याबाबत मालकांकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.
राजीव नेवगी यांनी मुरगाव पालिकेच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने इमारत पाडण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २० लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले पाडकाम मालक स्वतःच्या खर्चाने करणार आहेत. निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास महानगरपालिकेला पुढील चार आठवड्यांत पाडकाम करण्याचे निर्देश न्यायालयानेदिले आहेत.
दरम्यान, इमारतीतील दुकाने, कार्यालये आणि रहिवासी आपले फर्निचर, यंत्रसामग्री, कागदपत्रे व इतर साहित्य स्थलांतरित करताना दिसत आहेत. अनेकांसाठी निओगी मॅन्शन हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ घर किंवा व्यवसायाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे या वास्तूशी असलेले भावनिक नाते तुटत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.