Varsha Usgaonker: 'गोवेकर असल्याचा मला अभिमान', मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरकडून मोपाचे कौतुक

विमानतळावर काढलेले काही फोटो वर्षा उसगावकर यांनी शेअर केले आहेत.
Varsha Usgaonker
Varsha UsgaonkerDainik Goamantak
Published on
Updated on

Varsha Usgaonker: गोव्यात नव्याने झालेल्या मोपा येथील मनोहर विमानतळ (Manohar Airport Goa) 05 जानेवारी पासून कार्यान्वित झाले. पहिल्या दिवशी हैद्राबाद येथून इंडिगोची पहिली फ्लाईट गोव्यात दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे 11 डिसेंबर रोजी झाले. मनोहर विमानतळ राज्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला उभारी देईल असे उद्गार पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) यावेळी काढले.

(Marathi Actress Varsha Usgaonker Visit New Manohar Airport at Mopa Goa Shares Videos And Pictures)

Varsha Usgaonker
Watch Video: रितेशच्या ‘वेड’ ची क्रेझ टांझानियाच्या किली पॉललाही, पाहा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे नुकतेच मनोहर विमानतळावर आगमन झाले. वर्षा उसगावकर मनोहर विमानतळाच्या प्रेमात पडल्या आहेत. विमानतळावर काढलेले काही फोटो वर्षा उसगावकर यांनी शेअर केले आहेत. 'मोपा येथील सुंदर मनोहर विमानतळ, गोवेकर असल्याचा मला अभिमान आहे.' असे ट्विट उसगावकर यांनी केले आहे.

Varsha Usgaonker
Nagarjuna House Goa: सिनेस्टार नागार्जुनच्या घर बांधकामाची पाहणी

तसेच, विमानतळावरील एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओत काही तरूण मुले-मुली नृत्य करताना दिसत आहेत.

Varsha Usgaonker
Shankar Mahadevan Song: गोवा म्हणजे दिल चाहता है! असं म्हणणाऱ्या शंकर महादेवन यांची प्रसिद्ध गाणी तुम्ही ऐकलीत का?

पर्पल फेस्टिव्हलसाठी गोव्यात आलेले प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी देखील मनोहर विमानतळावर आल्यानंतर येथून एक व्हिडिओ शेअर केला होता. महादेवन यांनी विमानतळावर सुरू असलेल्या संगीत बॅन्डचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. मोपा विमानतळ खुपच सुंदर आणि येथील वातवरण प्रसन्न असल्याचे गायक शंकर महादेवन यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com