Goa Temples: पोर्तुगीजांनी उद्धवस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी; स्थळांच्या शिफारशींसाठी समिती स्थापन

तीस दिवसांत स्थळांची शिफारस करण्याची सूचाना समिताला करण्यात आली आहे.
Goa Temples
Goa TemplesDainik Gomantak

पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेली मंदिरे पुन्हा बांधण्याची योजना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी डिसेंबर 2021 मध्ये जाहीर केली. यासाठी सरकारने मोठा निधी देखील मंजूर केला आहे.

दरम्यान, पोर्तुगीज काळात नष्ट झालेल्या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धाराच्या स्थळांची शिफारस करण्यासाठी डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तीस दिवसांत स्थळांची शिफारस करण्याची सूचाना समिताला करण्यात आली आहे.

Goa Temples
Vasco Hit And Run Case: भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, फरार तरूणाला दाबोळीत अटक

कोण कोण आहे समितीत?

पीईएस महाविद्यालय फर्मागुडी येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वर्षा कामत, यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये डॉ. रोहित फळगावकर, डॉ.वरद सबनीस, बालाजी शेणवी, उल्हास प्रभु देसाई हे सदस्य आहेत.

गोवा सरकारने पोर्तुगीज काळात नष्ट झालेल्या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धार आणि नूतनीकरणासाठी 20 कोटींची तरतूद केली आहे.

Goa Temples
Ranji Trophy: गोव्याचा मोठा विजय; एक डाव, चार धावा राखून सेनादलाचा पराभव

पुरातत्त्व विभागाद्वारे पोर्तुगीज कालखंडात नष्ट करण्यात आलेल्या देवस्थानाच्या माहिती मागविण्यात आली होती. त्या अनुषंगाने पुरातत्त्व खात्याकडे निवेदने आली असून ही निवेदने आणि अर्जांची छाननी करण्यासाठी शासनाद्वारे तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याच्या पुरातत्व विभागाने पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेल्या अशा सर्व ऐतिहासिक स्थळांबाबत सर्वसामान्य जनता, स्वयंसेवी संस्था, इतिहासकार आणि इतरांकडून माहिती मागीतली होती. संबंधित कागदपत्रे किंवा छायाचित्रे सादर करण्यासाठी 31 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com