

डिचोली: नार्वे येथील सप्तकोटीश्वर देवस्थानअंतर्गत येणाऱ्या काळभैरव मंदिरातील फंडपेटी फोडल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित चोरट्याला अटक केली आहे. सावळो रामनाथ कोरगावकर असे संशयित चोरट्याचे नाव असून, तो धारगळ-पेडणे येथील आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे.
फंडपेटी फोडण्याचा हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. याप्रकरणी देवस्थानचे एक पदाधिकारी मंदार सरदेसाई यांनी डिचोली पोलिसांत तक्रार केली होती. संशयिताला पकडण्यात दयेश खांडेपारकर आणि जानू दावणे या पोलिस कॉन्स्टेबलांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कुठ्ठाळीतून घेतले ताब्यात
संशयित सावळो याने मंदिरात प्रवेश करून गर्भकुडीच्या दरवाजाबाहेर असलेल्या फंडपेटीचे कुलूप तोडून आतील रोख रक्कम लंपास केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सराईत चोरटा सावळो यानेच फंडपेटी फोडल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुठ्ठाळी येथे कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.