Goa Market: राज्यात तापमानाचा पारा चढलेलाच; लिंबाचे दरही वाढले

पालेभाज्यांच्या दरातही वाढ
lemon Price Hike
lemon Price HikeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Market: दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असून महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे खिसे रिकामे केले आहेत. राज्यात तापमानाचा पार वाढू लागल्याने शीतपेयांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

उन्हाचा जोर वाढू लागल्याने घशाची कोरड भागवण्यासाठी अनेक व्यक्ती लिंबूपाणी पिण्याला पसंती देतात. याच वाढत्या मागणीमुळे मडगावात लिंबूचे दर 8 रुपयांनी वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे तर पणजीत 10 रुपयांना 2 ते 3 लिंबू असे मिळत आहेत. त्यामुळे आता लिंबू पाण्याला (Lemon Water) अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

lemon Price Hike
Zuari Bridge Accident : नव्या झुआरी पुलावर पहिला अपघातबळी

लिंबूचे दर 8 रुपयांनी वाढले असून 3 लिंबू 30 रुपयाला अशा भावाने विकले जात आहेत. शहाळ्यांच्या मागणी वाढ झाली असून 40 रुपयांना एक शहाळे या भावाने विकले जात आहे. राज्यात ठिकठिकाणी शहाळ्यांचे गाडे दिसून येत आहेत.

भाजीपाल्याच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते. बाजारपेठेत ग्रामीण तसेच शहरी भागातील तांबडी भाजी, मुळा, मेथी, पालक अशा अनेक पालेभाज्या विक्रिसाठी येत आहेत.

दर प्रती किलो (रुपयांत)

कांदा - 35

बटाटा - 40

टॉमेटो - 28 ते 30

गवार - 70

कोबी - 50

फ्लावर - 15 ते 20

गाजर - 100

भेंडी - 85

शिमला मिरची - 100

मिरची - 80 ते 100

बीट 50

काकडी - 50

आले - 120

वांगी - 150

कारली - 80

लिंबू 30 (3 नग)

lemon Price Hike
Gati Shakti Scheme : ‘गतिशक्ती’ अंतर्गत विकासाला गती; पणजीत आज पहिली कार्यशाळा

किराणा प्रति रु किलो

चणे - 100

चणाडाळ - 75

मसूर - 110

मसूरडाळ - 150

तूर - 170

तूरडाळ - 130

साखर - 30

गोड - 40

उडीद - 120

उडीद डाळ - 110

मूग - 130

मूगडाळ - 120

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com