Gati Shakti Scheme : ‘गतिशक्ती’ अंतर्गत विकासाला गती; पणजीत आज पहिली कार्यशाळा

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे आयोजन
PM Gati Shakti Scheme Workshop in panajim
PM Gati Shakti Scheme Workshop in panajimDainik Gomantak

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (डीपीआयआयटी) उद्या, सोमवारी (ता. २०) रोजी पणजीतील ताज विवांता येथे पश्‍चिम आणि मध्य विभागांसाठी पहिली प्रादेशिक कार्यशाळा होणार आहे.

कार्यशाळेच्या अध्यक्षपदी मंत्रालयाच्या विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) सुमिता डावरा या असतील. कार्यक्रमाला गोव्यासह गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे प्रधान सचिव आणि वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (PM Gati Shakti Scheme Workshop in panaji)

PM Gati Shakti Scheme Workshop in panajim
Zuari Bridge Accident : नव्या झुआरी पुलावर पहिला अपघातबळी

रेल्वेसह द्रुतगती मार्गांना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी ऊर्जा मंत्रालय पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन करत आहे.

उपक्रमांतर्गत १०० गंभीर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. याद्वारे रेल्वे आणि रस्त्यांच्या शेवटच्या टप्प्याच्या कनेक्टिव्हिटीवर लक्ष असेल, असे सुमिता डावरा म्हणाल्या.

पाच राज्यांतील वरिष्ठ उपस्थित

गतिशक्ती कार्यक्रमांतर्गत द्रुतगती मार्ग आणि रेल्वे हे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे प्रकल्प राज्याद्वारे मॅप केले जातात.

कार्यशाळेचे उद्दिष्ट सर्वांगीण नियोजनासाठी पंतप्रधान गतिशक्तीच्या व्यापक अवलंबनाला प्रोत्साहन देणे आहे. या उपक्रमातील राज्ये मास्टर प्लानवर (एसएमपी) प्रकल्प नियोजनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल आहे.

सुविधांना प्राधान्य

पायाभूत सुविधा आणि सामाजिक प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी गतिशक्ती प्रकल्प राबविला जातो. यातील राज्य अधिकाऱ्यांना एसएमपीचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली जात आहे.

- सुमिता डावरा, विशेष सचिव, मंत्रालय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com