Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak

Goa Weather Update: गोव्यातील तापमानात होणार वाढ, आयएमडीने वर्तवली शक्यता

शुक्रवारी कोरडे हवामान अनुभवायला मिळाले असून राज्यात मंगळवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे
Published on

गोव्यात काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून गोव्यातील तापमान 20 अंशच्या खाली आले होते. 3-4 दिवसांपूर्वी गोव्यात सकाळी दाट धुके पसरले होते. मात्र आज भारतीय हवामान विभागाने राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होईलअसा अंदाज वर्तवला आहे.

शुक्रवारी गोव्यात कोरडे हवामान अनुभवायला मिळाले असून राज्यात मंगळवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर कायम राहील. त्यामुळे इतर कोणत्याही आर्द्रतेचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी, कोरडे वारे प्रबळ होतील, आणि तापमान सामान्यतः वाढेल असे आयएमडीने म्हटले आहे.

Goa Weather Update
Water Sports: मोठी बातमी! गोव्यातील आणखी दोन समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सना परवानगी

आयएमडी शास्त्रज्ञ राजश्री व्हीपीएम यांनी सांगितले. शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस होते, तर किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. आदल्या दिवसाच्या तुलनेत किमान तापमानात अंदाजे एक अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. 24 तासांत किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर त्यात कोणताही मोठा बदल होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com