Water Sports: मोठी बातमी! गोव्यातील आणखी दोन समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सना परवानगी

समुद्रातील अंतर्गत खडकाळ क्षेत्रामुळे पॅरासेलिंग या क्रीडाप्रकाराला परवानगी देण्यात आली नाहीय.
Water Sports In Goa
Water Sports In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मीरामार आणि केरी समुद्रकिनारे पर्यटन विभागाकडून बोट राइड आणि डॉल्फिनस्पॉटिंग ट्रिप या जलक्रीडांसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत. जेट स्की राईड, फ्लॅटेबल बनाना आणि बंप राइड्स, विंच पॅरासेलिंग, आयलंड ट्रिप, कयाकिंग आणि स्टँड-अप सर्फ बोट्सना केरी समुद्र किनारी परवानगी देण्यात आली आहे.

मात्र समुद्रातील अंतर्गत खडकाळ क्षेत्रामुळे पॅरासेलिंग या क्रीडाप्रकाराला परवानगी देण्यात आली नाहीय.  गेल्या काही महिन्यांपासून पर्यटन विभाग येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाला आहे. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवर सिंगल विंडो सिस्टीम सुरु केली जाणार असून  दोन्ही किनार्‍यांच्या प्रवेशद्वारांवर तिकीट काउंटर उभारले जाणार आहेत.

Water Sports In Goa
Goa Flight Bomb Threat : पुन्हा बॉम्बची धमकी! गोव्यात येणारे अझूर एअरलाइन्स उझबेकिस्तानमध्ये वळवले

तसेच याबाबत अधिक माहिती अशी की , मीरामार येथे फक्त PNI-नोंदणीकृत जहाजांना चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे. मांडवी नदीचा प्रवाह आणि बार्जेस लक्षात घेता पर्यटन विभागाने दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवरील सर्व जहाजांना लाइफ जॅकेट, अग्निशामक उपकरणे आणि प्रथमोपचार पेटी सुसज्ज ठेवण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com