IFFI Goa: मेगास्टार चिरंजीवी यांना 'Indian film personality of the year' पुरस्कार प्रदान

परफेक्ट नंबर' या पोलिश चित्रपटाने इफ्फीचा शेवट
Indian film personality of the year
Indian film personality of the yearDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष लागून राहीलेला 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज ( 28 नोव्हेंबर रोजी ) झाला. या कार्यक्रमात तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा कार्यक्रम डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पार पडला.

(Telugu actor Chiranjeevi to receive the 'Indian film personality of the year' award today )

Indian film personality of the year
Rajesh Pednekar IFFI 2022: ‘वाघ्रो’नंतर आता आणखी एक मोहेंजोदडो' - राजेश पेडणेकर

चिरंजीवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, हा पुरस्कार देण्यासाठी आपण मला पात्र मानले, तसेच माझा हा पुरस्कार देत सन्मान केला याबद्दल सर्वांचे खुप खुप आभार, माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. मात्र आजपर्यंत मिळालेला मान - सन्मान, प्रसिद्धी सर्वकाही केवळ आणि केवळ फिल्म इंडस्ट्रीमुळे मिळू शकले असल्याचे ते म्हणाले.

या सोहळ्याला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये अक्षय कुमार आशा पारेख, आयुष्मान खुराना, मानुषी छिल्लर, ईशा गुप्ता, राणा दुग्गुबती, आनंद राय यांनी उपस्थित लावली.

Indian film personality of the year
Asha Parekh IFFI 2022: 'दादासाहेब फाळके पुरस्कार हा माझ्‍यासाठी सुखद धक्का' - आशा पारेख

'परफेक्ट नंबर' हा पोलिश चित्रपटाने शेवट

या महोत्सवाचा शेवटचा चित्रपट 'परफेक्ट नंबर' हा पोलिश चित्रपट असून याचे दिग्दर्शन क्रिझिस्टोफ झानुसी यांनी केले आहे. तर आयुष्मान खुराना त्याच्या आगामी 'अ‍ॅन अॅक्शन हिरो' चित्रपटातील गाण्यांवर परफॉर्म केला आहे.

79 देशांतील 280 चित्रपट प्रदर्शित

नऊ दिवस सुरु असलेल्या या महोत्सवात 79 देशांतील 280 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. 'इंडियन पॅनोरमा' मध्ये भारतातील 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवण्यात आल्या होत्या तर 183 फिल्म्स आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंगचा भाग होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com