IFFI Goa 2022: देशाच्या चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला ही आनंदाची बाब आहे. मात्र दोन दिवस माझे मन ते मानायला तयार नव्हते. मी सर्वप्रथम देवाचे आभार मानले, कारण माझ्यासाठी हा खूप मोठा सुखद धक्का होता. हा पुरस्कार मिळविणारी मी पहिली गुजराती महिला आहे, असे इफ्फीतील ‘इन-कन्वर्सेशन’ या सत्रात बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी सांतिगले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल आशा पारेख यांना 2020 वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 30 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यंदाच्या इफ्फीत आशा पारेख यांनी ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंझिल’, ‘दो बदन’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘बहारों के सपने’ आदी विविध चित्रपटांमध्ये काम करतानाचा अनुभव सांगितला.
अभिनयाशिवाय टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मितीमधील कारकिर्द याबाबत पारेख म्हणाल्या की, ‘ज्योती’ ही गुजराती मालिका यशस्वी ठरल्यामुळे आत्मविश्वास मिळाला. यातूनच आणखी टीव्ही मालिका करायला प्रेरणा मिळाली.
यशस्वी कारकिर्द
आशा पारेख एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती आणि कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरवात केल्यानंतर त्यांनी ‘दिल देके देखो’ चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून पदार्पण केले.
त्यानंतर त्यांनी 95हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1994 ते 2000 या काळात त्या सिने आर्टिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. 1998-2002 या काळात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (सेन्सॉर बोर्ड) पहिल्या महिला अध्यक्ष राहिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.