Teachers Day: गोव्यातील मारिया मिरांडांचा राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते गौरव

Goa Teachers Day: मारिया मिरांडा सरकारी विद्यालय मोरपिर्लाच्या मुख्याध्यापिका आहेत
Maria Miranda
Maria MirandaDainik Gomantak
Published on
Updated on

Quepem Teachers Day: मारिया मिरांडा यांना या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना आज शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रौपदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अत्यंत ग्रामीण भागात तसेच शंभर टक्के अनुसूचित जमातीचे विद्यार्थी असलेल्या सरकारी विद्यालय मोरपिर्लाच्या त्या मुख्याध्यापिका आहेत.

मिरांडा या 34 वर्षे शिक्षकी पेशात आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर व शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन उपक्रम राबवले. गेली सात वर्षे दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. याचे श्रेय मिरांडा यांनी आपल्या सहकारी शिक्षकांना दिले आहे. कोविड (Covid) महामारीच्या काळात मिरांडा या आपल्या घरामध्ये स्वस्थ न बसता ग्रामीण भागातील मुलांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी मोरपिर्ला येथे येऊन मुलांना बस, देवळात तसेच घरोघरी भेट देऊन अभ्यासक्रम सुरू ठेवला. आपल्या चारचाकी गाडीमध्ये सर्व प्रकारची पुस्तके ठेवून एक प्रकारे आपल्या गाडीची मोबाईल लायब्ररी करून गावात फिरवून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला.

Maria Miranda
Michael Lobo : मायकल लोबो गोव्यात परतले; मात्र दिल्लीत नेमके कुणाला भेटले?

* मोरपिर्ला (Morpirla) हा ग्रामीण भाग असल्याने येथील पालकांची स्थिती पाहता ‘लो कॉस्टिंग’ अभ्यासक्रमावर भर दिला. याचा बराच फायदा त्यांना झाला.

* मोरपिर्ला येथे आपल्या आतापर्यंतच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात मिरांडा यांनी अनेक नवीन उपक्रम राबवून त्यांना सर्व क्षेत्रात पुढे करून सरकारी विद्यालयातील मुले कुठल्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिले आहे.

* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात विद्यालयाचे नाव उज्वल केले असून यात एका विद्यार्थ्याने जपान येथील साकुरा विज्ञान प्रकल्पात सहभाग घेतला होता तसेच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ओझोन पोस्टर स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले आहे. ‘eat right’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पाच बक्षिसे प्राप्त केली आहेत.

Maria Miranda
Mopa Airport : मोपा विमानतळावर पहिल्या विमानाचं 'लॅन्डिंग'

* ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारात सुद्धा आपले नाव कमावले असून खो खो व कबड्डी खेळात त्यांनी तालुका व राज्य स्तरावर अनेक बक्षिसे मिळवली आहेत.

* मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाच्या शिक्षकांनी दर वर्षी मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत ठेवून सरकारी विद्यालयातील शिक्षक सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल बनवू शकतात.

* मिरांडा यांनी आपल्या 34 वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात नवीन उपक्रम राबवून त्याचा फायदा मुलांना कसा होईल, यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला. मिरांडा यांच्या शिक्षण क्षेत्रातील हे कार्य पाहून त्यांना मानाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गोव्याचा खरा अर्थाने गौरव केला आहे, असे मोरपिर्ला येथील ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com