New Year Celebration : गोव्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात पोलिस बंदोबस्त तैनात

Goa Beach: गोव्यात रात्री 10 नंतर कर्कश आवाजातील संगीत नृत्यरजनी पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
Goa Beach News Year Celebration | Goa Beach New Year 2023 Party |
Goa Beach News Year Celebration | Goa Beach New Year 2023 Party | Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach: नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी राज्यात पर्यटकांची समुद्रकिनारी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. राज्यातील किनारे पर्यटक व स्थानिकांसह फुलून गेले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही अधिक सक्रिय करण्यात आला आहे.

रात्री 10 नंतर कर्कश आवाजातील संगीत नृत्यरजनी पार्ट्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवण्यासाठी गस्ती पथके तसेच किनाऱ्यांवर आयआरबी पोलिसांची वर्णी लावण्यात आली आहे. किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसासह गृहरक्षकांना संध्याकाळनंतर तैनात करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी परिसरातील पोलिस प्रमुखांना घेऊन अधीक्षक निधीन वाल्सन यांनी परेड केली होती. रात्री उशिरा 10 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचे संगीत सुरू असल्यास कारवाई केली जाईल. पोलिस त्यावर नजर ठेवून असल्याच संदेश या परेडवेळी देण्यात आला. रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग केलेली वाहनेही जप्त करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत.

Goa Beach News Year Celebration | Goa Beach New Year 2023 Party |
Goa Corona Update : जाणून घ्या गोव्यातील आजची कोरोनाची स्थिती; सरकारने दिला सतर्कतेचा इशारा

कळंगुट येथील कॅफे मँबोस टीटोस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असल्याने या ठिकाणी पोलिस तैनात केले गेले आहेत. नाताळपूर्वी सर्व पोलिस स्थानकांनी हॉटेल्स व रेस्टॉरंट्स मालकांची बैठक बोलावून त्यांना कायद्याचे पालन तसेच वेळेचे बंधन यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या व उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध संगीत यंत्रसामग्री जप्त करण्याबरोबरच हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स बंद करण्याबाबतही कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असे निदर्शनास आणून दिले.

कळंगुट व हणजूण पोलिस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या स्थानकाच्या क्षेत्रात आयआरबी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. स्थानिक पोलिसांसाठी सध्या कर्मचारी वाढवून देण्यात आला आहे. वाहतूक पोलिस कक्षासाठी गृहरक्षकांची किनारपट्टी परिसरातील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असलेल्या जंक्शनवर वर्णी लावण्यात आली आहे.

कळंगुट व हणजूण हे किनारपट्टी परिसरातील मुख्य पोलिस स्थानके असल्याने त्यांना पर्यटन पोलिस तसेच साळगाव पोलिस स्थानकातील पोलिस देण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काही परिसरात एटीएस कमांडोसच्या मदतीने मॉक ड्रील करण्यात आले. पोलिसांची या भागामधून झालेली परेड ही गुन्हेगाराना वचक बसू शकते. काही सराईत व अट्टल गुन्हेगारांना पोलिस स्थानकांवर बोलावून आधीच कानपिचक्या देण्यात आल्या आहेत व त्यांच्यावर नजर आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील फेरीवाले व भिकारी यांची धरपकड करण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहे. हे फेरीवाले व भिकारी पर्यटकांच्या मागे लागून त्यांना फिरताना अडथळे आणतात. पर्यटकांना मुक्तपणे फिरता यावे यासाठी या फेरीवाल्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे फर्मान अधीक्षक वाल्सन यांनी काढले आहे.

ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट रोखण्यासाठी किनारपट्टी भागात साध्या वेशातील पोलिसांची वर्णी लावण्यात आली आहे. ड्रग्जची विक्री करत असलेल्या काही संशयास्पद हॉटेल्स व रेस्टॉरंट्सवर नजर ठेवली आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट्स यांना त्यांना असलेल्या परवानगीनुसार ती रात्री उशिरापर्यंत खुली ठेवण्यास मुभा असेल मात्र रात्री 10 वाजल्यानंतर संगीत वाजवता येणार नाही.

वागातोरमध्ये तीन दिवस सनबर्न महोत्सव

वागातोर येथे तीन दिवस सनबर्न महोत्सव आयोजित केला असला तरी त्यांचे संगीतही रात्री 10 वाजल्यानंतर बंद करावे लागणार आहे. पूर्वीप्रमाणे महोत्सव बेकायदा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास दिला जाणार नाही. उच्च न्यायालयाने रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे खुल्या जागेत सुरू असलेल्या संगीतरजनी पार्ट्या व कर्कश ध्वनी संगीत याबाबत गंभीर दखल घेतलेली आहे.

त्यासंदर्भात खंडपीठाने सरकारला वेळोवेळी निर्देशही दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करून अशा पार्ट्या सुरू असल्यास संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानक प्रमुख तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, अशी ताकीदही दिलेली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com