नगरपालिकांच्या हिशेब तपास कामास अखेर मिळाली मंजुरी : गुरुदास पिळर्णकर

पालिकांचे हिशेब का तपासले गेले नाहीत, याबद्दल कित्येकांनी प्रश्र्न उपस्थित केले होते
TCP Department
TCP DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या चार ते पाच वर्षांत राज्‍यातील अनेक नगरपालिकांचे हिशेब तपासले नव्हते. आता नगरविकास खात्याच्या पालिका प्रशासन खात्याने हिशेब तपास कामास मंजुरी दिली असून, तसे आदेश अकाउंट्‌स संचालनालयाला लवकरच देण्‍यात येणार असल्‍याचे समजते.

खात्याकडून नगरपालिकांना वेगवेगळ्या कामांसाठी जो निधी दिला जातो, त्याचा वापर व नियोजन व्यवस्थित होत आहे की नाही, हे पाहणे हिशेब तपासकामाने शक्य होणार असल्याचे नगरपालिका प्रशासन खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांचे म्हणणे आहे.

TCP Department
Mormugao : मुरगाव पालिकेचे 1 कोटी 5 लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

हिशेब तपासाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी गोवा नगरपालिका अकाउंट्‌स कोड 2007 मध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे. गुरुवारच्या सरकारी राजपत्रात त्याबद्दल स्पष्ट करण्यात आले आहे.

2007 कायद्याच्या नियम 2.3 मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे डायरेक्टोरेट ऑफ अकाउंट्‌स किंवा त्यांनी पाठविलेल्या प्रतिनिधीद्वारे गोवा नगरपालिका कायदा 1968 च्या कलम 100 खाली हिशेब तपासणीचे अधिकार प्राप्त होणार आहेत.

पालिकांचे हिशेब का तपासले गेले नाहीत, याबद्दल कित्येकांनी प्रश्र्न उपस्थित केले होते. पालिकांनी हिशेब तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन सचालकांनी केले आहे. मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी हिशेब तपासणी प्रक्रिया निर्णयाचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Health Services
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa Child Rights Commission Funds Blocked
Dr Ketan Bhatikar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com