Mormugao : मुरगाव पालिकेचे 1 कोटी 5 लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

मुरगाव पालिका मंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली
Mormugao Municipalityl |Mahadayi Water Dispute
Mormugao Municipalityl |Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao : मुरगाव पालिका मंडळाच्‍या बैठकीत 2023-24 वर्षाचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सर्वसाधारण महसूल अंदाजपत्रक सुमारे एक कोटी पाच लाखाचे शिलकी दाखविले आहे. त्यामध्ये महसूल 3823.30 लाख तर खर्च 3702.40 लाख दाखविण्यात आला आहे.

हे शिलकी अंदाजपत्रक कागदावर चांगले दिसत असले तरी प्रत्यक्षात ते किती खरे उतरेल, याबद्दल काही नगरसेवकच शंका उपस्थित करीत आहेत.

मुरगाव पालिका मंडळाची बैठक काल शुक्रवारी रवींद्र भवनाच्या परिषद सभागृहात झाली. नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, मुख्याधिकारी जयंत तारी तसेच इतर अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी अंदाजपत्रकावर चर्चा झाली.

Mormugao Municipalityl |Mahadayi Water Dispute
Goa Water Problem: मोतीडोंगर भागात पाणी विभागाचा गलथानपणा

पालिका मंडळाच्या बैठकीत बरेच ठराव घेतले जातात, मात्र त्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. घरपट्टी तसेच लिजवर दिलेल्या मालमत्तेपासून मुरगाव पालिकेला अधिकाधिक महसूल मिळतो.

यावेळेसही अंदाजपत्रकात घरपट्टी व लिजपासून मोठा महसूल मिळणार असे दाखविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात घरांची जी संख्या दाखविली आहे, तेवढी घरे आहेत काय? असा प्रश्न उपस्‍थित करण्‍यात आला. मुरगाव पालिका कार्यालयीन इमारतीसमोर पे पार्किंग सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तेथे सध्या टुरिस्ट टॅक्सीवाल्यांनी आपला स्‍टँड उभारला आहे.

म्‍हणून पालिकेला सहन करावे लागतेय नुकसान

बायणा समुद्रकिनाऱ्यावरील सुमारे एक हजार बेकायदा घरे मोडण्यात आली आहेत. त्या घरांची घरपट्टी वाढत असल्याचेही दाखविण्यात आले आहे. त्यातील बऱ्याच घरांना घरपट्टीच नाही. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी मुरगाव पालिका हद्दीतील घरांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घ्यावे. ज्यांनी विस्तार

तसेच पक्के बांधकाम केलेले आहे, त्या घरांच्या घरपट्टीत बदल होऊ शकतो असे काही जणांनी सांगितले. लीजसंबंधीही तीच परिस्थिती आहे. बऱ्याच जणांनी आपली दुकाने व इतर आस्थापने दुसऱ्यांना भाड्याने दिलेली आहेत. यामुळे मुरगाव पालिकेला नुकसान सहन करावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com