ISRO: 2023मध्ये इस्रोचे 'गगनयान' अंतराळात झेपावणार

स्पेस अप्लिकेशनच्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक स्टार्टअप मैदानामध्ये उतरले आहेत. याआधी हे सगळे क्षेत्र फक्त इस्रोच्याच ताब्यात होते.
ISRO
ISRODainik Gomantak
Published on
Updated on

ISRO: नव्या वर्षामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ 2023 मध्ये बरेच अचाट प्रयोग घडवून आणणार आहेत. सूर्याशी निगडित ‘आदित्य’ आणि चंद्राशी संबंधित असणाऱ्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमांच्या माध्यमातून बऱ्याच नव्या गोष्टी हाती येऊ शकतात, असा विश्वास संशोधकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

‘स्पेस अप्लिकेशन’मध्येही स्टार्टअप सेक्टर भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. पुढील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीमध्ये ‘गगनयान’ प्रकल्पाचा नारळ फुटणार असून ही पहिली मानवरहीत मोहीम असेल.

या मोहिमेच्या माध्यमातून लॉंच व्हेईकल, ऑर्बिटल मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टिम आणि रिकव्हरी ऑपरेशन आदींचे मूल्यमापन केले जाणार आहे. नव्या वर्षामध्ये इस्रो पहिल्यांदाच विमानाप्रमाणे प्रक्षेपण केंद्रावर उतरू शकणाऱ्या आणि फेरवापर करता येणाऱ्या प्रक्षेपकाची चाचणी घेणार आहे.

कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील केंद्रावर ही चाचणी घेण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी याच महिन्यामध्ये याबाबतची माहिती दिली होती.

ISRO
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी श्रीपाद नाईक आक्रमक; सर्वपक्षीयांसह पंतप्रधानांना भेटणार

स्पेस अप्लिकेशनच्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक स्टार्टअप मैदानामध्ये उतरले आहेत. याआधी हे सगळे क्षेत्र फक्त इस्रोच्याच ताब्यात होते. पृथ्वी निरीक्षण उपग्रहे, तुलनेने लहान उपग्रहे यांची निर्मिती तसेच उपग्रहांसाठी स्वस्तातील इंधनाची निर्मिती आणि अवकाश पर्यटनाचे दालन खुले करण्यासाठी खासगी क्षेत्राने पुढाकार घेतला आहे.

स्पेस अ‍ॅपमध्ये संशोधनासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. याच अ‍ॅप कंपन्यांनी औषध निर्माण, कृषी क्षेत्रात भागीदारी केल्यास मोठे यश मिळू शकते, असे ‘ध्रुवस्पेस’चे चैतन्यदोरा सुरापुरेड्डी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com