Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa Fishing Boat Missing: तळपण येथून मासेमारीसाठी गेलेले चार मच्छिमार अखेर तब्बल १२ तासांच्या धाकधुकीनंतर सापडले.
Fishing Boat Missing
Fishing Boat MissingDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: तळपण येथून मासेमारीसाठी गेलेले चार मच्छिमार अखेर तब्बल १२ तासांच्या धाकधुकीनंतर सापडले. पेट्रोल संपल्यामुळे त्यांची बोट समुद्रात भरकटली होती. मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजता ही बोट अंकोला (कारवार) परिसरात आढळून आली असून, सर्व मच्छिमारांना सुखरूप तळपण जेटीवर आणण्यात आले.

भरकटलेली ही बोट सागर गोकुळदास नमशीकर यांच्या मालकीची असून, बोटीत संदीप आरोलकर, चेतन आरोंदकर, अनिकेत गोवेकर आणि सागर नमशीकर हे चार खलाशी होते. सर्व मच्छिमार सुखरूप असल्याची माहिती क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष रूद्रेश नमशीकर यांनी दिली.

दरम्यान, किनारी सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक टेरेन्स डिकॉस्टा हे आपल्या पथकासह शोध मोहिमेसाठी समुद्रात उतरले होते. त्यांनीच मच्छिमार आणि बोट सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती दिली. सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास बोट तळपण जेटीवर दाखल झाली. दीर्घकाळ उन्हात अडकल्यामुळे सर्व मच्छिमार थकलेले व त्रस्त अवस्थेत असल्याचे डिकॉस्टा यांनी सांगितले.

Fishing Boat Missing
Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

दोन तास महामार्ग रोखला

मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून तातडीची पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ मच्छिमारांनी मंगळवारी दुपारी मडगाव–कारवार हमरस्ता अडवून आंदोलन केले. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे मोहनदास लोलयेकर, पंकज नमशीकर, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, शुभम कोमरपंत यांच्यासह मच्छिमार उपस्थित होते.

Fishing Boat Missing
Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षक निलेश राणे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम राबवावी, अशी मागणी क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष रूद्रेश नमशीकर यांनी केली होती. दरम्यान, सकाळी आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी तळपण जेटीवर भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com