Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Goa University election cancelled: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची राज्यस्तरीय निवडणूक आज सकाळी १० ते १२.३० दरम्यान होणार होती.
Goa University Election
Goa University ElectiondAINIK gOMANTAK
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची राज्यस्तरीय निवडणूक मंगळवारी सकाळी १० ते १२.३० दरम्यान होणार होती; परंतु अचानकपणे निर्धारित निवडणुकीच्या पंधरा मिनिटांपूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्‍यांच्या निर्देशानुसार निवडणूक रद्द करत येत्या काही दिवसांत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे पत्रक गोवा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालनालयाने जारी केले.

या निर्णयाला गोवा विद्यापीठाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची सहमती असल्याचे नमूद केले गेले. परंतु अचानक निवडणूक रद्द केल्यामुळे ‘अभाविप’ व ‘एनएसयूआय’ न धरणे आंदोलन करत या अचानक घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा देखील ठेवण्यात आला होता. विद्यार्थी निर्णयाचे कारण आम्हाला संचालक ए.व्हिएगश यांनी सांगावे, अशी मागणी करत होते.

Goa University Election
Goa Nightclub Fire: लुथरा बंधू आज गोव्यात, 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड; गोवा पोलिसांनी दिल्लीत घेतला ताबा

हा विद्यार्थ्यांचा अवमान!

गोवा विद्यापीठ आणि जिल्हाधिकाऱ्यांना राज्यात जिल्हापंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे, याची कल्पना यापूर्वी नव्हती का? अचानक निवडणुकीच्या १५ मिनिटांपूर्वी निवडणूक रद्द करण्याच्या प्रकारातून विद्यापीठ प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. केवळ एक पत्रक जारी करून निवडणूक रद्द करणे हा विद्यार्थ्यांचा अवमान असल्याचे ‘अभाविप’ संयोजक शुभम मळीक यांनी सांगितले.

याचिका दाखल करणार!

निवडणूक कधीही घेवोत, मात्र विजयी आम्हीच होणार आहोत. पंधरावर्षानंतर विद्यापीठ मंडळात सत्ता बदल निश्‍चित आहे. अचानक निवडणूक रद्द केल्याच्या प्रकाराबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नौशाद चौधरी यांनी सांगितले.

Goa University Election
Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

वेळ किती मिळणार?

शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होते आणि आता डिसेंबरमध्ये निवडणुका होणार होत्या, त्या आता जानेवारीत होतील आणि शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये संपुष्टात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यार्थी मंडळाला वेळ तो किती मिळेल. आम्ही नेहमी विद्यार्थ्यांसोबत राहणार असून अशा प्रकारे अचानक निवडणूक रद्द करणे चुकीचे असल्याचे मत गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष ऋतिक मांद्रेकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com